ETV Bharat / technology

2025ची टीव्हीएस रोनिन 1.35 लाख रुपयांना लाँच, बाईकमध्ये काय झाले बदल? - TVS RONIN LAUNCH

टीव्हीएस मोटर कंपनीनं 2025ची टीव्हीएस रोनिन लाँच केली आहे, ज्यामध्ये सुरक्षा वैशिष्ट्यांसह अपग्रेड मिळताय. तसंच ही दुचाकी दोन नवीन रंगात लॉंच झालीय.

2025 TVS Ronin
टीव्हीएस रोनिन (TVS)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Feb 19, 2025, 11:21 AM IST

हैदराबाद : देशात अनेक सेगमेंटमध्ये विकल्या जाणाऱ्या स्कूटर आणि बाईकची उत्पादक कंपनी टीव्हीएसनं 2025 ची टीव्हीएस रोनिन बाईक लाँच केली आहे. बाईकमध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत? त्यात कोणते नवीन फीचर्स जोडले गेले आहेत? ती कोणत्या किंमतीला खरेदी करता येईल? चला जाणून घेऊया...

टीव्हीएस रोनिन 2025
टीव्हीएस 200 सीसी पेक्षा मोठ्या सेगमेंटमध्ये रोनिन बाईक ऑफर करते. आता ही बाईक काही अपडेट्ससह लाँच करण्यात आली आहे. बाईकच्या डिझाइन आणि इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. परंतु ती दोन नवीन रंग आणि सुरक्षा वैशिष्ट्यांसह आणण्यात आली आहे.

TVS Ronin 2025 मध्ये नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये
2025 TVS Ronin बाईकमध्ये अनेक उत्तम वैशिष्ट्ये आणि सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. परंतु आता तिच्या मिड व्हेरिएंटमध्ये ड्युअल चॅनेल ABS सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देखील ऑफर केली जात आहे. याशिवाय, बाईकमध्ये LED हेडलाइट, LED टेल लाईट, कस्टम एक्झॉस्ट, असममित स्पीडोमीटर, 17-इंच अलॉय व्हील्स आणि दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

TVS Ronin 2025 इंजिन
TVS Ronin बाईकमध्ये 225.9 सीसी इंजिन आहे. यामुळं बाईकला 20.4 पीएस पॉवर आणि 19.93 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. कमी वेगानं बाईक चालवण्यासाठी GTT देखील देण्यात येत आहे. याशिवाय, असिस्ट आणि स्लिपर क्लच व्यतिरिक्त USD फोर्क्स दिले जात आहेत.

TVS Ronin 2025 किंमत
TVS ची नवीन Ronin बाईक 1.35 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येईल. त्याच वेळी, त्याच्या मिड व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 1.59 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या बाईकला ग्लेशियर सिल्व्हर आणि चारकोल एम्बर असे दोन नवीन रंग पर्याय देण्यात आले आहेत.

कोणासी असेल स्पर्धा

रोनिन ही टीव्हीएसनं आधुनिक रेट्रो मोटरसायकल म्हणून ऑफर केली आहे. किंमत आणि इंजिनच्या बाबतीत, ती बजाज पल्सर एनएस200, केटीएम ड्यूक 200, होंडा एनएक्स 200 आणि हिरो एक्सपल्स 200 4व्ही सारख्या बाइक्सशी स्पर्धा करते.

हे वाचलंत का :

  1. टेस्ला कंपनीची भारतात नोकर भरती सुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, एलोन मस्क भेटीनंतर 13 जागांवर भरती
  2. ऑडी आरएस क्यू8 परफॉर्मन्स भारतात लाँच, ताशी 305 किलोमीटरपर्यंत टॉप स्पीड
  3. BYD Sealion 7 इलेक्ट्रिक SUV भारतात लाँच, एका चार्जवर 587 किमीची रेंज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.