कराची AFG vs SA 3rd Match Live Streaming : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप बी मधील पहिला सामना अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात 21 फेब्रुवारी रोजी कराची येथील राष्ट्रीय स्टेडियमवर दुपारी 2:30 वाजता खेळवला जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असेल.
Afghanistan's finest from #ICCAwards 2024 on show 🤩
— ICC (@ICC) February 18, 2025
1. Azmatullah Omarzai (ICC Men's ODI Cricketer of the Year and ICC Men's ODI Team of the Year)
2. Rashid Khan (ICC Men's T20I Team of the Year)
3. Rahmanullah Gurbaz (ICC Men's ODI Team of the Year) pic.twitter.com/P7i8Un45Yc
अफगाणिस्तान पहिल्यांदाच स्पर्धेत : पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणाऱ्या अफगाणिस्ताननं काही महिन्यांपूर्वी सप्टेंबर 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-1 असा पराभव केला होता. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानचा आत्मविश्वास सध्या शिगेला पोहोचलेला असेल. परिणामी त्यांना अपसेट करण्याची मोठी संधी आहे. हशमतुल्लाह शाहिदी अफगाणिस्तानचं नेतृत्व करेल. त्याच्याशिवाय संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
Afghanistan are all set for their debut #ChampionsTrophy campaign 🙌 pic.twitter.com/68AA5Hc3oD
— ICC (@ICC) February 18, 2025
आफ्रिकेचाही मजबूत संघ : दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका हा एक संतुलित संघ आहे. टेम्बा बावुमा संघाचं नेतृत्व करेल. दक्षिण आफ्रिकेला अलिकडेच त्रिकोणी मालिकेत न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्या सामन्यांमध्ये संघातील वरिष्ठ खेळाडू खेळत नव्हते. अशा परिस्थितीत, वरिष्ठ खेळाडूंच्या आगमनानं, दक्षिण आफ्रिका स्पर्धेत एक मजबूत संघ आहे.
Fresh look and mission ready! 🏏🏆💪.
— Proteas Men (@ProteasMenCSA) February 20, 2025
Catch the Proteas as they take on Afghanistan in their opening match on Feb 21 at 11 am, live on SuperSport 📺. #WozaNawe #BePartOfIt #ChampionsTrophy pic.twitter.com/AfOkfxucvR
दोन्ही संघाचा वनडेत हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ वनडे सामन्यांमध्ये 5 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात दक्षिण आफ्रिकेचा काहीसा वरचष्मा दिसतो. दक्षिण आफ्रिकेनं 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर अफगाणिस्ताननं 2 सामने जिंकले आहेत. यावरुन दक्षिण आफ्रिकेचा संघ अधिक मजबूत असल्याचे दिसून येतं.
Introducing the ICC #ChampionsTrophy Temba Bavuma avatar! 🏆🇿🇦
— Proteas Men (@ProteasMenCSA) February 18, 2025
Our skipper is locked in, focused, and ready to lead the Proteas to glory.
Catch the Proteas in their opening match of the tournament on the 21st at 11am CAT live on SuperSport 📺.#WozaNawe #BePartOfIt… pic.twitter.com/uzkROOUrpx
2023 च्या वनडे विश्वचषकाच्या गुणतालिकेत अफगाणिस्तान सहाव्या क्रमांकावर : अफगाणिस्तान संघात रशीद खान, नूर अहमद, रहमानउल्लाह गुरबाज, इब्राहिम झदरानसारखे खेळाडू आहेत. हे खेळाडू काही चेंडूंमध्ये सामन्याचा मार्ग बदलतात. अफगाणिस्ताननं 2023 च्या वनडे विश्वचषकात भाग घेतला आणि एकूण 4 सामने जिंकले. ते पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर होते. 2023 च्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या गुणतालिकेतील टॉप-8 संघ 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होत आहेत.
Intensity 🆙!
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) February 19, 2025
📸: AfghanAtalan continue to put in hard yards as they gear up for their maiden participation at the ICC #ChampionsTrophy 2025. 🤩#AfghanAtalan will begin their journey in the mega event by facing the Proteas this Friday in Karachi. 👍… pic.twitter.com/Cm51drUejI
कराची स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल : कराचीतील राष्ट्रीय स्टेडियम त्याच्या सातत्यपूर्ण वेग आणि उसळीमुळं फलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टी प्रदान करु शकते. खेळाच्या सुरुवातीला नवीन चेंडूचा फायदा वेगवान गोलंदाजांना होऊ शकतो. पण जसजसा खेळ पुढं जाईल तसतसं फिरकीपटूची भूमिका महत्त्वाची होत जाईल.
अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा तिसरा सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा तिसरा सामना 21 फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी कराची येथील राष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक दुपारी 02:00 वाजता होईल.
𝙿𝚒𝚌𝚝𝚞𝚛𝚎 𝙿𝚎𝚛𝚏𝚎𝚌𝚝! ⚡🤩
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) February 18, 2025
📸: ICC/Getty#AfghanAtalan | #ChampionsTrophy | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/frKpdrXhBA
अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा तिसरा सामना कुठं आणि कसा पहावा?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे भारतात अधिकृत प्रसारण हक्क जिओस्टार नेटवर्ककडे आहेत. चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर विविध प्रादेशिक भाषांमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहू शकतात. याशिवाय, डिजिटल स्ट्रीमिंगचे अधिकार देखील जिओस्टार नेटवर्ककडे आहेत आणि सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर फ्रीमध्ये उपलब्ध असेल.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
अफगाणिस्तान : हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झद्रान, रहमानउल्लाह गुरबाज, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, इकराम अलीखिल, गुलबदिन नायब, अझमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, नांग्याल खरोती, नूर अहमद, फजलहक फारुकी, फरीद मलिक, नावेद झद्रान.
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, मार्को जानसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन, कॉर्बिन बॉश.
हेही वाचा :