मुंबई Milind Rege Passed Away : भारतीय क्रिकेटसाठी एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचं बुधवार, 19 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. अहवालानुसार, त्यांच्या किडनीनंही काम करणं थांबवलं होतं. गेल्या आठवड्यात 16 फेब्रुवारी रोजी त्यांनी त्यांचा 76 वा वाढदिवस साजरा केला आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आता त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुलं आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांचं एक मोठं नाव होतं आणि टीम इंडियाचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्करचे ते जवळचे मित्र होते. विशेष म्हणजे दोघंही मुंबईसाठी एकत्र क्रिकेट खेळले होते. त्यांच्या निधनावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सुनिल गावस्कर, मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, रवी शास्त्री यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
The BCCI mourns the passing of Milind Rege, former Mumbai captain and selector. A pillar of Mumbai cricket, he played a key role in its growth and legacy. His keen eye for talent and contributions as a commentator earned admiration across the cricketing fraternity.
— BCCI (@BCCI) February 19, 2025
The Board… pic.twitter.com/LQjU8wHmgs
हृदयविकाराच्या झटक्यानं सोडावं लागलं क्रिकेट : मिलिंद रेगे यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की त्यांना क्रिकेटची खूप आवड होती. पण वयाच्या 26व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यामुळं त्यांना त्यांचा आवडता खेळ सोडावा लागला. जर हे घडलं नसतं तर ते टीम इंडियाकडून खेळू शकले असते. मात्र ते त्यांच्या कारकिर्दीत फक्त देशांतर्गत क्रिकेटपुरते मर्यादित राहिले. खेळ सोडल्यानंतरही ते क्रिकेटशी जोडले गेले आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनची सेवा करत राहिले. ते जवळजवळ 3 दशकं एमसीएचे निवडकर्ता होते. क्रिकेट सुधारणा समितीचाही ते एक भाग होते. सध्या, वयाच्या 76 व्या वर्षीही ते क्रिकेट सल्लागार म्हणून असोसिएशनशी जोडलेले होते.
Deeply saddened by the passing of Milind Rege Sir. A true stalwart of Mumbai cricket, his invaluable contributions as a player, selector, and mentor shaped generations of cricketers. His unwavering support and guidance will always be remembered, and his legacy will continue to… pic.twitter.com/qBlt21Jns4
— Ajinkya Naik - President, MCA. (@ajinkyasnaik) February 19, 2025
सचिनला संधी देण्यात भूमिका : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं 1988-89 च्या हंगामात स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा तो फक्त 15 वर्षांचा होता. सचिनच्या मुंबई संघातील निवडीत मिलिंद रेगे यांचा मोठा हात असल्याचं मानलं जातं. 1988-89 मध्ये ते एमसीए निवड समितीचा भाग होते. त्यांच्यामुळंच सचिनला प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए मध्ये संधी मिळाली. सचिनचा सुरुवातीपासूनचा प्रथम श्रेणीमधला क्रिकेट प्रवास त्यांनी जवळून पाहिला होता.
Really sad to hear about the demise of a dear friend Milind Rege. A true Champion in his contribution to Mumbai and Tata's cricket all-round. A Mentor Par Excellence. Heartfelt condolences to Raj and family. God bless his soul. pic.twitter.com/ZrB1fHAizg
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) February 19, 2025
मिलिंद रेगे यांची कारकीर्द : मिलिंद रेगे यांची कारकीर्द जवळजवळ एक दशक चालली. ते 1966-67 ते 1977-78 पर्यंत देशांतर्गत क्रिकेट खेळले. परंतु ते कधीही टीम इंडियासाठी पदार्पण करु शकले नाही. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी फिरकी गोलंदाज म्हणून 52 सामने खेळले. या डावांमध्ये त्यांनी 23.56 च्या सरासरीनं 1532 धावा केल्या होत्या. गोलंदाजीत त्यांनी 29.83 च्या सरासरीनं 126 विकेट्स घेतल्या आहेत.
Sad to hear about Milind Rege Sir's passing. He was a true Mumbai cricketer with immense contributions to the city's cricket. He and other CCI members saw potential in me and asked me to play for CCI, which, as I look back now, was a landmark moment in my career.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 19, 2025
He could pick… pic.twitter.com/MD00ghszkW
हेही वाचा :