ETV Bharat / sports

10 वर्षांनंतर यजमान संघ पाहुण्यांविरुद्ध घरच्या मैदानावर सिरीज जिंकणार? निर्णायक मॅच 'इथं' पाहा लाईव्ह - ZIM VS IRE 2ND ODI LIVE

झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड क्रिकेट संघ यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना 16 फेब्रुवारी (रविवार) रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे इथं खेळवला जाईल.

ZIM vs IRE 2nd ODI Live Streaming
झिम्बाब्वे क्रिकेट संघ (ZIM Cricket X Handle)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Feb 16, 2025, 2:58 AM IST

हरारे ZIM vs IRE 2nd ODI Live Streaming : झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आज 16 फेब्रुवारी (रविवार) रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे इथं खेळवला जाईल. पहिल्या वनडे सामन्यात, ब्रायन बेनेटच्या शानदार 169 धावांच्या खेळीमुळं झिम्बाब्वेनं विजय मिळवला. झिम्बाब्वेच्या फलंदाजानं केलेली ही पाचवी सर्वोच्च वनडे धावसंख्या होती. ब्लेसिंग मुझाराबानी आणि रिचर्ड नगारावा यांच्या शानदार गोलंदाजीमुळं झिम्बाब्वेनं 49 धावांनी महत्त्वपूर्ण विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

यजमानांची नजर मालिका विजयावर : दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी दोन्ही संघ आपली छाप पाडण्यास उत्सुक असतील. झिम्बाब्वे मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल, तर आयर्लंड संघ हा सामना जिंकत मालिकेत टिकून राहण्याचा प्रयत्न करेल. झिम्बाब्वे त्यांच्या अलीकडील निराशाजनक कामगिरीतून सावरण्यासाठी उत्सुक असेल. यजमान संघानं शानदार खेळ केला आहे. पण, सातत्य दाखवण्यात त्यांना अपयश आलं आहे. आयर्लंडविरुद्ध मालिका विजय त्यांच्या मनोबलाला आणि क्रिकेटच्या आकांक्षांना मोठी चालना देईल. तसंच हा सामना जिंकत यजमान झिम्बाब्वे संघ 10 वर्षांनंतर आयरिश संघाविरुद्ध मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. त्यांनी यापुर्वी ऑक्टोबर 2015 मध्ये आयर्लंडविरुद्ध वनडे मालिका जिंकली होती.

हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 23 वनडे सामन्यांमध्ये आयर्लंडनं झिम्बाब्वेवर आघाडी घेतली आहे. आयर्लंडने 10 सामने जिंकले आहेत, तर झिम्बाब्वेला फक्त 9 सामने जिंकता आले आहेत. याशिवाय, 1 सामना बरोबरीत सुटला आणि 3 सामने निकालाशिवाय संपले आहेत. आकडेवारीनुसार, आयर्लंडचा संघ मजबूत दिसतो, परंतु झिम्बाब्वेला त्यांच्या घरच्या परिस्थितीचा फायदा मिळू शकतो.

पहिल्या सामन्यात काय झालं : तत्पुर्वी पहिल्या वनडे सामन्यात, आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर झिम्बाब्वेनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत पाच गडी गमावून 299 धावा केल्या. झिम्बाब्वेकडून सलामीवीर ब्रायन बेनेटनं 169 धावांची शानदार खेळी केली. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अँड्र्यू बालबर्नी खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर पाहुण्या संघांच्या ठराविक अंतरानं विकेट गमावल्या आणि संपूर्ण आयर्लंड संघ 46 षटकांत फक्त 250 धावांवर ऑलआउट झाला. आयर्लंडकडून कर्टिस कॅम्फरनं सर्वाधिक 44 धावांची आक्रमक खेळी खेळली.

झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?

झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना 16 फेब्रुवारी (रविवार) रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे इथं भारतीय वेळेनुसार दुपारी 1:00 वाजता भारतीय वेळेनुसार खेळला जाईल. याची नाणेफेक दुपारी 12:30 वाजता होईल.

झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना कुठं आणि कसा पाहायचा?

झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील द्विपक्षीय मालिका भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर प्रसारित केली जाणार नाही. तथापि, आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे दुसरा वनडे सामना फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहता येईल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :

आयर्लंड : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, अँडी मॅकब्राइन, मार्क अडायर, ग्राहम ह्यूम, मॅथ्यू हम्फ्रीज, जोशुआ लिटिल

झिम्बाब्वे : तादिवानाशे मारुमानी (यष्टीरक्षक), बेन कुरन, क्रेग एर्विन (कर्णधार), सिकंदर रझा, ब्रायन बेनेट, वेस्ली माधेवरे, जोनाथन कॅम्पबेल, वेलिंग्टन मसाकाड्झा, न्यूमन न्यामहुरी, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी

हेही वाचा :

  1. आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू फिजा सय्यद साईचरणी लीन..., पाहा व्हिडिओ
  2. केन 'फास्टेस्ट' विल्यमसन... पाकिस्तानविरुद्ध केला महापराक्रम, विराटला टाकलं मागे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.