ETV Bharat / entertainment

प्रियांका चोप्रानं दयाळूपणानं जिंकली मनं , मुंबईत गरजूला केली मदत... - PRIYANKA CHOPRA

प्रियांका चोप्राचा आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ती एका गरजूला मदत करताना दिसत आहे.

Priyanka Chopra
प्रियांका चोप्रा (प्रियांका चोप्रा (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 19, 2025, 2:22 PM IST

मुंबई - ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा मुंबईत परतली आहे. ती नुकतीच कलिना विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी प्रियांकानं राखाडी रंगाचा स्वेटपँट, राखाडी रंगाचा टॉप आणि कॅप घातली होती. कॅज्युअल लूकमध्ये ती देसी गर्ल नेहमीप्रमाणे देखणी दिसत होती. दरम्यान, प्रियांका चोप्राचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांका कारमधून बसून असल्याची दिसत आहे. याशिवाय ती सिग्नलवर थांबते आणि तिच्या कार जवळ असलेल्या एका गरजू व्यक्तीला काही पैसे देते. या व्हिडिओमध्ये प्रियांकाचा चेहरा दिसला नाही. आता प्रियांकाच्या या मदतीनं अनेक चाहते तिचं सोशल मीडियाच्या माध्यामातून कौतुक करत आहेत.

प्रियांका चोप्राचा व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल : व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओवर लिहिलं, 'हा व्हिडिओ मन जिंकणारा आहे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'प्रियांका ही एक चांगली व्यक्ती आहे.' आणखी एकानं लिहिलं, 'ती एक क्वीन आहे.' तसेच या व्हिडिओवर अनेकजण हार्ट इमोजी शेअर करू 'देसी गर्ल'वर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तिचा हा व्हिडिओ अनेकजण पसंत करत आहेत. सध्या प्रियांका ही भारतात तिच्या आगमी चित्रपटावर काम करत आहे. प्रियांका हैदराबादमध्ये तिच्या चित्रपटाच्या शूटिंग करत आहे. ती अनेकदा हैदराबाद ते मुंबई प्रवास करत असते.

प्रियांका चोप्रा करणार 'या' स्टारबरोबर काम : 'देसी गर्ल' प्रियांका साऊथ चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'एसएसएमबी29' या चित्रपटातून भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर साऊथ स्टार महेश बाबू दिसणार आहे. हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रियांका या चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारत आहे. तसेच बऱ्याच दिवसानंतर प्रियांकाचा या चित्रपटामध्ये एक वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाद्वारे प्रियांका भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत असल्यानं तिचे चाहते देखील खूश आहेत.

हेही वाचा :

  1. ऑस्करच्या शर्यतीतला 'अनुजा' लघुपट पाहण्याचा प्रियांका चोप्रानं दिला सल्ला, शेअर केली सुंदर पोस्ट...
  2. लग्नाच्या वरातीपासून ते सात फेऱ्यांपर्यंत, भावाच्या लग्नात थिरकली प्रियांका चोप्रा
  3. प्रियांका चोप्रानं पती निक जोनाससह भावाच्या संगीत समारंभात केली धमाल, व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.