मुंबई-लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे वादाच्या ( Rahul Gandhi X post) भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी एक्स मीडियावरून पोस्ट करताना छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्याऐवजी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे भाजपाकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशभरात उत्साहानं साजरी करण्यात येत आहे. देशभरातील विविध नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. दुसरीकडं राहुल गांधी यांनीदेखील एक्स मीडियावर पोस्ट केली. महापुरुषांना पुण्यतिथीला श्रद्धांजली वाहण्यात येते. तर जयंतीला आदरांजली वाहण्यात येते. पण, राहुल गांधींनी शिवरायांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे एक्स मीडियावरील ही पोस्ट वादग्रस्त ठरली आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते हे एक्स मीडियावरील या पोस्टमुळे टीकेचे धनी झाले आहेत.
छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 19, 2025
अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज़ उठाने की प्रेरणा दी।
उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेगा। pic.twitter.com/1jOCYOkrC1
राहुल गांधींनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये काय म्हटले? राहुल यांनी त्यांच्या एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, " छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरपूर्वक वंदन करतो. त्यांना मी विनम्रपणे श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या धैर्यानं आणि शौर्यानं आम्हाला निर्भयतेनं आणि पूर्ण समर्पणानं आपला आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहील."
भाजपाची काँग्रेस नेत्यावर टीका- राहुल गांधींनी शिवरायांच्या जयंतीला श्रद्धांजली वाहिल्यानं भाजपानं टीका केली. भाजपानं एक्स मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं, "जाणून-बुजून शिवजन्मोत्सवाच्या दिवशी राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांना श्रद्धांजली देण्याचा विकृतपणा दाखवला आहे. महापुरुषांचा फक्त राजकीय फायद्यासाठी वापर करणे ही काँग्रेसची घाणेरडी मानसिकता नेहमी जनतेसमोर उघड होते. या शिवद्रोही काँग्रेसला तमाम हिंदू बांधव कधीही माफ करणार नाहीत."
जाणून-बुजून शिवजन्मोत्सवाच्या दिवशी राहुल गांधींने छत्रपती शिवरायांना श्रद्धांजली देण्याचा विकृतपणा दाखवला आहे.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 19, 2025
महापुरुषांचा फक्त राजकीय फायद्यासाठी वापर करणे ही काँग्रेसची घाणेरडी मानसिकता नेहमी जनतेसमोर उघड होते.
या शिवद्रोही काँग्रेसला तमाम हिंदू बांधव कधीही माफ करणार नाहीत.… pic.twitter.com/XDJIvIQOxu
भाजापाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींवर टीका केली. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, " ज्यांच्या खानदानाचा इतिहास मुघलांच्या आरत्या ओवाळण्याचा आहे. ज्यांच्या पणजोबांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानास्पद लिखाण केले होते. त्या राहुल गांधींना महाराजांबाबत श्रद्धा असण्याचं काही कारण नाही. त्यामुळेच जयंती दिवशी त्यांनी श्रद्धांजली अर्पण करून शिवरायांचा अपमान केलेला आहे. हा निव्वळ बावळटपणा नाही, नसानसात भिनलेल्या तुष्टीकरणाच्या राजकारणातून हे घडलेले आहे. तीव्र निषेध…"
हेही वाचा-