ETV Bharat / bharat

रायपूरवरुन कुंभमेळ्याला जाणाऱ्या बसला अपघात; उभ्या ट्रेलरला धडकली बस, वाहक ठार - RAIPUR TO PRAYAGRAJ BUS ACCIDENT

प्रयागराजला कुंभमेळ्याला जाणाऱ्या रायपूरच्या खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसचा वाहक ठार झाला. ही घटना छत्तीसगड आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर मंगळवारी रात्री घडली.

Raipur To Prayagraj Bus Accident
बस अपघात (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2025, 2:09 PM IST

रायपूर : रायपूरहून प्रयागराजला कुंभमेळ्याला जाणारी प्रवासी बस उभ्या ट्रेलरवर धडकून भीषण अपघात झाला. हा अपघात वेंकटनगर आणि खैरझिठी गावाजवळ घडला. या अपघातात बस कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला. या प्रवासी बसमध्ये 23 प्रवासी जखमी झाले आहेत. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, बसमध्ये 32 ते 33 प्रवासी प्रवास करत होते.

Raipur To Prayagraj Bus Accident
बस अपघात (ETV Bharat)

कोळशानं भरलेला ट्रेलर बिघडल्यानंतर छत्तीसगड मध्यप्रदेश सीमेवर उभा होता. रायपूरहून येणारी बस या ट्रेलरला धडकली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे. जखमी प्रवाशांना वेंकटनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अनेक जखमींना अनुप्पूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बस वाहकाचा मृत्यू झाला आहे. - श्याम सिदार, उपविभागीय पोलीस अधिकारी पेंड्रा रोड

प्रयागराजवरुन कुंभमेळ्याला जात होती बस : प्रयागराजला कुंभमेळ्यात जाण्यासाठी अनेक प्रवासी रात्री 11 वाजता खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसनं रायपूरहून निघाले. रात्रभर प्रवास केल्यानंतर बस पहाटे 5 च्या सुमारास गौरेला पेंड्रा मारवाही इथं पोहोचली. इथं बस चालकानं रस्त्याच्या कडेला असलेल्या एका चहाच्या टपरीजवळ गाडी थांबवली. सर्व प्रवासी तिथं फ्रेश झाले आणि चहा घेतला. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, "चहाच्या टपरीवर बस चालक बदलला. रायपूरहून बस चालवणारा चालक तिथंच थांबला. त्यानंतर दुसऱ्या चालकानं पेंड्राहून बस चालवायला सुरुवात केली. छत्तीसगड-मध्यप्रदेश सीमेवरील झिरो बॉर्डर परिसरात कोळशानं भरलेल्या उभ्या असलेल्या ट्रेलरशी बसची टक्कर झाली," अशी माहिती या बसमधील प्रवाशानं दिली

आम्ही रायपूरहून प्रयागराजला कुंभमेळ्याला निघालो. पेंड्रा इथल्या चहाच्या टपरीवर चालक बदलला. चालक खूप वेगानं गाडी चालवत होता. रोडवर उभ्या असलेल्या ट्रेलरला बसनं मागून धडक दिली. बसमध्ये 32 प्रवासी होते. - अशोक गाडेवाल, प्रवासी, रायपूर

अपघातात बस वाहकाचा जागीच मृत्यू : या अपघातात बस वाहकाचा जागीच मृत्यू झाला. या बसमधील 23 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी असलेल्या 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. या जखमींवर मध्यप्रदेशातील वेंकटनगर आणि अनुपनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

छत्तीसगड आणि मध्यप्रदेश पोलिसांनी केल बचावकार्य : अपघाताची माहिती मिळताच छत्तीसगडच्या गौरेला पेंड्रा मारवाही जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ओम चंडेल, उपविभागीय अधिकारी अमित बैक, श्याम सिदार यांच्यासह मध्यप्रदेशचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदत आणि बचावकार्य सुरू केलं. घटनेनंतर बसचालक फरार झाला आहे. प्रवाशांनी सांगितलं की, चालकाला वारंवार विनंती करूनही तो वाहनाचा वेग कमी करत नव्हता. त्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर छत्तीसगड-मध्यप्रदेश सीमेच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली.

हेही वाचा :

  1. भरधाव डंपरनं वाहनांना दिली धडक ; एकाच कुटुंबातील 5 वऱ्हाडी ठार, संतप्त नागरिकांचा रास्तारोको
  2. स्कॉर्पिओ आणि दुचाकीचा भीषण अपघात; सहा ठार, स्कॉर्पिओ चक्काचूर
  3. कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला: बस आणि कारच्या भीषण अपघातात 10 भाविक ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.