मुंबई - व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस आहे. हा दिवस प्रेमी युगुलांसाठी खूप विशेष असतो. व्हॅलेंटाईन डे असा एक दिवस आहे, जेव्हा प्रेमी युगुल आपल्या मनातील गोष्टी किंवा काही भेटवस्तू देऊन एकमेकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. या दिवशी अनेक जोडपे आपले नाते घट्ट करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात. आता या विशेष दिवशी आपल्या जोडीदाराला खुश करायचं असेल तर, तुम्ही काही सुंदर मराठी गाणी आपल्या जोडीदाराला ऐकवू शकता. आता आम्ही अशा काही विशेष मराठी गाण्याबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला गोष्ट ऐकायला खूप आवडेल.
1 'आभास हा' : 'यंदा कर्तव्य आहे' या चित्रपटातील 'आभास हा' हे गाणं खूप लोकप्रिय आहे. राहुल वैद्य आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं हे सुंदर गाणं नवविवाह जोडप्यांवर आधारित आहे. या गाण्यात अंकुश चौधरी आणि स्मिता शेवाळे हे कलाकार आहेत. या गाण्याला संगीत निलेश मोहरीर यांनी दिलं आहे.'यंदा कर्तव्य आहे' चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे.
2 'मला वेड लागले प्रेमाचे' : 'टाईमपास' चित्रपटामधील या किशोरवयीन प्रेमकथेतील आधारित 'मला वेड लागले प्रेमाचे' हे गाणं खूप विशेष आहे. या गाण्यात केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब हे कलाकार आहेत. हे गाणं स्वप्नील बांदोडकर यांनी गायलं आहे. याशिवाय या गाण्याला चिनार-महेश यांनी संगीत दिलं आहे. तसेच 'मला वेड लागले प्रेमाचे' गाण्याला गुरु ठाकूर यांनी लिहिलं आहे.
3 'तू ही रे माझा मितवा' : 'मितवा' चित्रपटातील 'तू ही रे माझा मितवा' हे भावनिक असून याचे बोल आकर्षक आहे. या सुरेल रोमँटिक ट्रॅकमध्ये स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहेरे आणि सोनाली कुलकर्णी आहेत. शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांनी गायलेले हे गाणं खूपच अप्रतिम आहे. या गाण्याला संगीत शंकर-एहसान-लॉय यांनी दिलं आहे.
4 'टिक टिक वाजते डोक्यात' : संजय जाधव दिग्दर्शित 'दुनियादारी'मधील 'टिक टिक वाजते डोक्यात' हे गाणं सुपर डुपर हिट ठरलं होतं. 'दुनियादारी' चित्रपटात मैत्री आणि प्रेमाची कहाणी दाखविण्यात आली आहे. यात स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर हे कलाकार आहेत. 'टिक टिक वाजते डोक्यात' गाण्यात सई आणि स्वप्नीलच्या पात्रांमधील नवोदित प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. हे गाणं सोनू निगम, सायली पंकज आणि वैभव पटोले यांनी गायलं आहे. या गाण्याला पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे.
5 'सैराट झाला जी' : आकाश ठोसर (पार्श्या) आणि रिंकू राजगुरू (आर्ची) वर चित्रित 'सैराट' मधील 'सैराट झाला जी' हे गाणं हाय-व्होल्टेज रोमँटिक गाणं आहे. अजय गोगावले आणि चिन्मयी श्रीपाद यांनी गायलेले हे प्रेमगीत अनेकांना पसंत आहे. या गाण्याला संगीत अजय - अतुल यांनी दिलं आहे.