ETV Bharat / health-and-lifestyle

व्हॅलेंडाईन्स-डे २०२५ : चुकूनही जोडीदाराला देऊ नका 'या' भेटवस्तू; नात्यावर पडेल विपरीत परिणाम - VALENTINES DAY 2025

तुम्ही देखील व्हॅलेंडाईन्स-डे निमित्त आपल्या प्रिय व्यक्तींना भेट देण्याच्या विचारात आहेत. तर खाली दिलेल्या भेटवस्तू चुकूनही देऊ नका.

VALENTINES DAY 2025  VALENTINES DAY GIFT IDEAS  MOST POPULAR VALENTINES DAY GIFT
व्हॅलेंडाईन्स-डे २०२५ (Freepik)
author img

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Feb 14, 2025, 1:57 PM IST

Valentines Day 2025: जगभरातील प्रेमी जोडपे ज्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहतात तो आजचाच दिवस. आज व्हॅलेंटाईन्स-डे, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात साजरा केला जातो. तसं पाहिलं तर संपूर्ण आठवडाभर व्हॅलेंटाईन विक सेलिब्रेट केलं जातं. आज या विकचा हा शेवटचा दिवस. एखाद्या व्यक्तिबद्दल मनात दडून ठेवलेली प्रेमाची भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून याकडे बघितलं जाते. प्रेमी युगल वेगवेगळ्या पद्धतीनं हा दिवस साजरा करण्याचा प्रयत्न करतात. हा दिवस खास बनवण्यासाठी ना-ना तऱ्हेचे प्रयत्न अनेक दिवसांपूर्वीपासूनच सुरू होतात. त्यामध्ये सर्वात महत्वाचं असते ते म्हणजे भेट वस्तू. व्हॅलेंटाईन्स-डे स्मरणात रहावा म्हणून भेटवस्तू देण्याची जणू परंपराच झालेली आहे. मात्र, ही भेटवस्तू देताना अगदी सजग राहिलं पाहिजे. कारण चुकीची वस्तू तुमच्या नात्यातील गोडवा कमी करण्यास कारणीभूत ठरू शकते. त्या भेटवस्तू कोणत्या तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

VALENTINES DAY 2025  VALENTINES DAY GIFT IDEAS  MOST POPULAR VALENTINES DAY GIFT
व्हॅलेंडाईन्स-डे २०२५ (Freepik)

कधीकधी आपण आपल्या जोडीदारांना अशा काही गोष्टी भेट म्हणून देतो. ज्या अजिबात योग्य नसतात. त्यामध्ये हात रुमाल, पेन तसंच घड्याळ यासारख्या वस्तू आहेत. भेट म्हणून या वस्तू कधीच देऊ नये. कारण यामुळे तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो अशी मान्यता आहे.

  • या भेटवस्तू द्या
  • रोमँटिक डिनर डेट: व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी आपल्या खास व्यक्तींसाठी रोमँटिक डिनर डेट प्लॅन करा. लग्न झालेल्या जोडप्यांनी घरीच रोमँटिक डिनर डेट प्लॅन करावं. त्याकरिता तुम्ही तुमची रूम सुंदर सजवा. तसंच तुमच्या खास व्यक्तीसाठी त्यांच्या आवडीचा पदार्थ स्वत: तयार करा. तुम्ही जेवण ऑर्डर देखील करू शकता. परंतु आवडत्या व्यक्तीकरिता एक तरी पदार्थ स्वत: बनवला तर उत्तम आहे.

  • गुलाबांचं गुच्छ: गुलाबाची फुले हे प्रेमाचं प्रतीक मानलं जाते. तुम्ही देखील जोडीदाराला गुलाब देवू इच्छित असणार तर एक गुलाब देण्याऐवजी गुलाबाच्या फुलांचा बुके द्या. तुमच्या खास व्यक्तीसाठी ही खास भेट ठरू शकते.

  • एलईडी हार्ट शो पीस किंवा ३ डी शो-पिस: जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला व्हॅलेंटाइन्स डे ला एक प्रेमळ भेट द्यायची असेल तर तुम्ही एलईडी हार्ट शो-पिस देऊ शकता. बाजारात तुमच्या बजेटनुसार हे उपलब्ध आहेत. याला अधिक आकर्षित बनवण्यासाठी, तुम्ही त्यावर तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाव देखील लिहू शकता.
  • फोटो फ्रेम: व्हॅलेंटाईन आठवड्यात तुमच्या जोडीदाराला भेट म्हणून फोटो फ्रेम किंवा मातीची मूर्ती देणे हा एक चांगला पर्याय आहे. यासोबतच, तुम्ही निसर्गाशी संबंधित चित्रे जसे की नद्या, पर्वत इत्यादी भेट देऊ शकता. अशा भेटवस्तू चांगल्या मानल्या जातात. यामुळे तुमचं नातं आणखी मजबूत होवू शकतं.

  • मेकअप किट: व्हॅलेंटाइन्स डेच्या या खास दिवशी तुमच्या जोडीदारासाठी मेकअप किट ही एक सुंदर भेट असू शकते. मुलींना मेकअप करणे फार आवडतं. म्हणून तुम्ही त्यांना मेकअप किट देऊन आनंदी करू शकता.
  • व्हॅलेंटाइन्स डे ला कोणत्या गोष्टी भेट म्हणून देऊ नयेत?
  • काळे कपडे: व्हॅलेंटाइन्स डे निमित्त बरेच लोक आपल्या जोडीदारांना कपडे भेट देतात. तुम्ही देखील कपडे देण्याच्या विचारात असणार तर काळ्या रंगाचे कपडे देणं टाळा. तसंच बूट किंवा चप्पल देखील देवू नये असं मानलं जातं.
  • ही झाडे देवू नये: भेट वस्तू म्हणून झाडे देण्याचा ट्रेंड सध्या वाढला आहे. जोडीदाराला झाडे देण्याचा बेत असेल तर निवडुंग किंवा इतर काटेरी वस्तू भेट देऊ नका. कारण यामुळे नात्यावर विपरीत परिणाम होवू शकतो. झाडे देतांना फुलं किंवा इतर शोभिवंत झाडांना पसंती द्या.
  • घड्याळ: व्हॅलेंटाईन डे ला तुम्ही तुमच्या जोडीदाराला कधीही घड्याळ भेट म्हणून देऊ नका.

हेही वाचा

व्हॅलेंटाइन डे २०२५ : किस-डे साजरा करताना लक्षात ठेवा 'या' धोकादायक गोष्टी

व्हॅलेंटाईन डे 2025 : नात्यातील गोडवा कायम ठेवण्यासाठी असा साजरा करा 'चॉकलेट डे'

व्हॅलेंटाईन डे 2025: असा साजरा करा 'प्रपोज-डे'; ठरेल अविस्मरणीय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.