राजनांदगाव : राजनांदगाव पोलिसांनी मुंबईतून आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला अटक केली आहे. या सायबर गुन्हेगारानं 60 हून अधिक बँक खात्यांमध्ये ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे व्यवहार करून लोकांना फसवले होते. आरोपी पीडितांची फसवणूक करत होता. त्या पैशांचा वापर करून क्रिप्टोकरन्सी खरेदी करत होता. हे पैसे बोडिया आणि चीनला पाठवत होता. या टोळीतील चार जणांवर पोलिसांनी आधीच कारवाई केली आहे.
आंतरराष्ट्रीय सायबर ठग टोळीचा पर्दाफाश: राजनांदगावचे एसपी मोहित गर्ग यांनी पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, "चिखली येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीनं पैशांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलीस या प्रकरणाचा बारकाईनं तपास करत होते. तपासादरम्यान, पोलिसांनी प्रथम चार आरोपींना अटक केली. यानंतर, मुंबईतील अंधेरी भागात राहणारा आरोपी रोहित महेश कुमार विरवानी याला राजनांदगाव पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी रोहित हा एका आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीत सामील होता. तो, कंबोडिया चायनीज फ्रॉड सेंटरमध्ये काम करणाऱ्या त्याच्या भारतीय चिनी सहकाऱ्यांसोबत सहकार्य करून, ऑनलाइन फसवणुकीसाठी भारतीय बँक खाती पुरवत असे. याशिवाय, तो या पैशातून क्रिप्टोकरन्सी खरेदी करायचा. कंबोडियातील त्याच्या भारतीय आणि चिनी मित्रांना वॉलेटद्वारे पाठवायचा. आरोपी कंबोडियातील विविध केंद्रांमधून विविध बनावट गुंतवणूक कंपन्यांच्या नावाखाली भारतीयांना फसवत होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे- मोहित गर्ग, एसपी, राजनांदगाव
आरोपी पोलीस कोठडीत : आरोपींनी ६० हून अधिक बँक खात्यांमध्ये ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करून लोकांची फसवणूक केली आहे. तर यातील मुख्य आरोपीही आता पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्याकडून फसवणूकीदरम्यान वापरलेला मोबाईल फोन, एटीएम कार्ड आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -
- हर्षल प्रधान यांचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक, जवळच्या व्यक्तींकडे पैशांची मागणी
- फोन पे कंपनीला 4 कोटींचा चुना, सायबर पोलिसांकडून दोघांना अटक - fraud with PhonePe company
- सायबर गुन्हेगारांनो सावधान! क्लिष्ट सायबर गुन्ह्यांची चुटकीत होणार उकल, पोलीस करणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर - देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis On Cyber Crim