रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेनेला (उबाठा) धक्का देत बुधवारी राजन साळवी यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता आज (13 फेब्रुवारी) राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.
राजन साळवींचा आरोप : लांजा राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी २०२४ चा पराभव जिव्हारी लागला असल्याचं सांगितलं. तसंच माजी खासदार विनायक राऊत हे विधानसभा निवडणुकीतील माझ्या पराभवाला कारणीभूत असल्यानं आपण ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडल्याचं साळवी यांनी सांगितलं. २०२४ चा पराभव माझ्या जिव्हारी लागला. या निवडणुकीत माझ्या पक्षातीलच नेत्यांनी माझ्याविरूद्ध काम केलं. विनायक राऊत हेच माझ्या पराभवाला कारणीभूत असून त्यांच्यामुळं मी पक्ष सोडत आहे, असं साळवी यांनी जाहीर केलं.
राजन साळवींच्या आरोपावर प्रत्युत्तर : गद्दारी करून दुसर्या पक्षात जात असताना, कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडण्याची सवय सर्वच पक्षबदलूंची असते. कालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधी उमेदवाराने त्यांच्यावर आरोप केले आहेत, त्यांनी सांगितलं की राजन साळवींकडं गद्दारीची १३ सर्टिफिकेट आहेत. २००४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार बाळ माने यांना पाडण्यासाठी उदय यांचा उदय करून घेतला हे जगजाहीर आहे.
निवडणुकीत आमच्याकडून पैसे घेतले : भाजपाचे आमदार निलेश राणे यांनी राजापूरच्या जव्हार चौकात जे जाहीर भाषण केलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की, या राजन साळवींनी प्रत्येक लोकसभा निवडणुकीत आमच्याकडून पैसे घेतले आहेत. हे जर खोटं असेल तर त्यांनी सांगावं याचा त्यांनी खुलासा केलेला नाही, असंही विनायक राऊत म्हणाले.
सामंतांच्या हाताखाली काम करण्याची नामुष्की : पराभवानंतर 100 बैठकांमध्ये राजन साळवी यांनी आता भाजपामध्ये जावं लागेल असा प्रचार केला होता. नाईलाज म्हणून राजन साळवी यांना ज्यांच्या विरोधात लढले, त्याच सामंतांच्या हाताखाली काम करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. बिकाऊ नेते पक्ष सोडून निघून गेले असले तरी आम्ही उभारी घेऊ असं विनायक राऊत म्हणाले.
![विनाय राऊत यांचे पत्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13-02-2025/23538534_vinayak-raut.jpg)
दरम्यान पक्षाचे रत्नागिरी समन्वयक रवि डोळस यांची पक्षविरोधी कारवाया केल्यानं पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांना पक्षातून काढून टाकल्याचं जाहीर निवेदन विनाय राऊत यांनी दिलं आहे.
हेही वाचा -
- कोकणात ठाकरेंना धक्का, राजन साळवींचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; उदय सामंतांसह दिग्गज नेते उपस्थित
- राजन साळवींचा ठाकरेंना 'जय महाराष्ट्र', आज करणार शिवसेनेत प्रवेश; भास्कर जाधव म्हणाले, "नाराजी दूर...."
- सामंत बंधूंना शह देण्यासाठी मिंधेंची खेळी, राजन साळवींच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर विनायक राऊत कडाडले