ठाणे : भूतदया हीच ईश्वरसेवा मानण्याऱ्यांचा आजचा जमाना नाही. मात्र प्राणीमात्रावर दया करा आणि त्यांना अन्न द्या असा संदेश देत गेली अनेक वर्षे एक महिला ठाण्यातील अनेक भागात पशुपक्षांना अन्न, पाणी देत आहे. एवढेच नाही तर, आजारी आणि जखमी प्राण्यांवर स्वखर्चातून उपचार देखील करत आहे. पी. सेलवी असं या महिलंच नाव. हे काम करण्यासाठी पी. सेलवी यांना महिन्याकाठी 25 ते 30 हजारांचा खर्च येतो.
समाजात वावरणाऱ्या पशुपक्ष्यांकडं दुर्लक्ष : रस्त्यावरून फिरत असताना अनेक पशुपक्षी आपल्याला दिसत असतात. मात्र त्यांच्याकडे आपण तिरस्काराच्या नजरेने पाहतो. रस्त्यावर फिरणारे कुत्रे, पशुपक्षी याकडं नेहमीच समाजाकडून दुर्लक्ष होत असतं. घरात पाळलेल्या प्राण्यांची ज्या तत्परतेनं आपण काळजी घेतो. त्याच समाजात वावरणाऱ्या याच पशुपक्षांकडं दुर्लक्ष होताना दिसून येतं.
दिवसाला लागतो 15 किलो तांदूळ आणि 6 किलो गहू : समाजात वावरणाऱ्या पशुपक्षांकडं आपलं दुर्लक्ष होतं ही बाब पी. सेलवी यांच्या लक्षात आली. यानंतर पी. सेलवी यांनी ठाण्यातील पशुपक्ष्यांची काळजी घ्यायली सुरूवात केली. त्यांनी या कामाला लॉकडाऊन पासून सुरूवात केली. यासाठी त्यांना महिन्याला 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो. त्यांना दिवसाला 15 किलो तांदूळ पाच ते सहा किलो गहू लागतो. यासह त्या इतर पशुपक्षांना लागणारं अन्न तयार करतात. यानंतर त्या ठाण्यातील इतर परिसरात अन्न पशुपक्षांचे वितरित करतात.

पशुपक्षी पाहतात पी. सेलवी यांची वाट : पी. सेलवी अन्न देण्यासाठी जातात तेव्हा पशुपक्षी त्यांची वाट पाहत नेहमीच्या ठिकाणी थांबलेले पाहायला मिळतात. समाजातून आणि घरातून होत असलेला विरोध डावलून पी. सेलवी हे काम करत आहेत. आपण गाईंना अन्न देतो, घरात पाळलेल्या कुत्र्यांना अन्न देतो, कारण गाईपासून आपल्याला दूध मिळते. कुत्र्यापासून संरक्षण मिळतं असा स्वार्थी विचार प्रत्येक मनुष्य करत असतो. मात्र, रस्त्यावर फिरणाऱ्या प्राण्यांकडे आपण दुर्लक्ष करतो. म्हणूनच मी हे पाऊल उचललं असं पी. सेलवी यांनी सांगितलं.

स्व: कमाईतून देतात अन्न : पशुपक्ष्यांना अन्न देत असताना त्यांना समाजातील नागरिकांनी हटकलं, त्यांच्या या कामाला विरोध केला. मात्र, पी. सेलवी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून नित्यनियमानं सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे कार्य करत असतात. हे कार्य करत असताना त्या कोणाकडूही पैसे घेत नाहीत. स्वतःच्या उत्पन्नातून हे काम करत असल्याचं पी. सेलवी यांनी सांगितलं.
अनेकदा झाला हल्ला : हे काम करत असताना प्राण्यांकडून त्यांच्यावर हल्ला देखील झाला आहे. मात्र असं, असलं तरी त्यांनी काम थांबवलं नाही. प्राण्यांकडून झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना काम बंद करायला सांगितलं. मात्र, त्यांनी हे काम सुरू ठेवलं. या कामात पी. सेलवी यांना त्यांचा अभियंता मुलगा, सून आणि दोन नातू मदत करतात. आपल्या सर्व उत्पन्नाला त्यांनी या प्राणी आणि पक्षांसाठी खर्च करायचं ठरवलं असून त्यानुसार त्यांचं अविरत काम सुरू आहे.
हेही वाचा :