दुबई ICC Champions Trophy 2025 : आजपासून ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरु होणार आहे. ही क्रिकेट स्पर्धा दीर्घ प्रतीक्षेनंतर परतणार आहे. ही स्पर्धा शेवटच्या वेळी 2017 मध्ये खेळवण्यात आली होती. तेव्हा इंग्लंडच्या यजमानपदाखाली खेळल्या गेलेल्या या स्पर्धेचं विजेतेपद पाकिस्ताननं जिंकलं होतं. आता जवळजवळ 8 वर्षांनंतर, चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळवली जाणार आहे. पण यावेळी ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर खेळवली जाईल. खरंतर, बीसीसीआयनं टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवलेलं नाही, अशा परिस्थितीत टीम इंडिया त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. याशिवाय उर्वरित संघांचे सामने फक्त पाकिस्तानमध्येच होतील. या स्पर्धेला 'मिनी वर्ल्ड कप' म्हणूनही ओळखलं जातं.
A mouth-watering match-up on the opening day of the #ChampionsTrophy 🔥
— ICC (@ICC) February 19, 2025
Find out how you can watch the big match here 📺 👉 https://t.co/AIBA0YZyiZ pic.twitter.com/r18cySFFT3
स्पर्धेत 8 संघ सहभागी : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 8 संघ खेळताना दिसतील, यात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि इंग्लंड या संघांचा समावेश आहे. या 8 संघांना 2 गटात विभागण्यात आलं आहे. गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. तर, गट ब मध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. सर्व संघ गट टप्प्यात एकदा त्यांच्या गटातील संघांशी खेळतील आणि त्यानंतर दोन्ही गटातील 2-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
Afghanistan are all set for their debut #ChampionsTrophy campaign 🙌 pic.twitter.com/68AA5Hc3oD
— ICC (@ICC) February 18, 2025
सामने कुठं खेळवले जातील : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान, एकूण 4 स्टेडियममध्ये सामने खेळवले जातील. ज्यामध्ये पाकिस्तानचे 3 आणि दुबईचं 1 स्टेडियम समाविष्ट आहे. पाकिस्तानमध्ये, सामने कराचीतील नॅशनल स्टेडियम, लाहोरमधील गद्दाफी स्टेडियम आणि रावळपिंडीतील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये होतील. दुबईमध्ये, टीम इंडिया त्यांचे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळेल. या स्पर्धेत सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरु होतील आणि नाणेफेक दुपारी 2 वाजता होईल.
India are locked in and ready for the #ChampionsTrophy 👊 pic.twitter.com/db4Mfd6CUm
— ICC (@ICC) February 18, 2025
अनेक स्टार खेळाडू स्पर्धेच्या बाहेर : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अनेक मोठे खेळाडू खेळताना दिसणार नाहीत. यामध्ये पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, जसप्रीत बुमराह, अँरिच नोर्किया, गेराल्ड कोएत्झी, सॅम अयुब, जेकब बेथेल, अल्लाह गझनफर, बेन सीअर्स आणि लोकी फर्ग्युसन यांचा समावेश आहे. मिचेल स्टार्क त्याच्या वैयक्तिक कारणांमुळं चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत नाहीय. याशिवाय, इतर सर्व खेळाडू दुखापतींशी झुंजत आहेत.
The captains. The challenge. The pursuit for glory!
— ICC (@ICC) February 18, 2025
It’s All on the Line at #ChampionsTrophy 2025 🏆 pic.twitter.com/NreHUPrcyL
टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक : टीम इंडिया 20 फेब्रुवारीपासून या स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करेल, या सामन्यात त्यांचा सामना बांगलादेशशी होईल. त्यानंतर टीम इंडिया आपला दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळेल. हा सामना 23 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. यानंतर, गटातील शेवटच्या सामन्यात, ते 2 मार्च रोजी न्यूझीलंडशी सामना करतील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामने खेळवले जातील.
Bangladesh are ready to roar at the #ChampionsTrophy 🔥
— ICC (@ICC) February 17, 2025
In frame 📸⬇️
1. Nazmul Hossain Shanto (c)
2. Mustafizur Rahman
3. Taskin Ahmed
4. Jaker Ali pic.twitter.com/0cUJ1YnHFs
भारतात तुम्ही सामने कुठं आणि कसे पाहू शकता : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारतीय संघाचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर वेगवेगळ्या भाषांमध्ये टेलिव्हिजनवर दाखवले जातील. तर, ते जिओहॉटस्टार नेटवर्कवर फ्रीमध्ये स्ट्रीम केलं जाईल. डिजिटल प्लॅटफॉर्मवर, चाहते हा सामना इंग्रजी, हिंदी, मराठी, हरियाणवी, बंगाली, भोजपुरी, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये ऐकू शकतील.
The Black Caps have their eyes set on #ChampionsTrophy glory 🙌
— ICC (@ICC) February 17, 2025
1. Mitchell Santner
2. Devon Conway
3. Kane Williamson
4. Lockie Ferguson pic.twitter.com/EVmflraQpW
स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ : या स्पर्धेच्या इतिहासातील टीम इंडिया हा सर्वात यशस्वी संघ आहे. भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत 29 सामने खेळले आहेत आणि 18 सामने जिंकले आहेत. तसंच तीन सामने अनिर्णीत राहिले. याशिवाय भारतानं दोनदा विजेतेपद जिंकले आहे. 2002 मध्ये, टीम इंडिया आणि श्रीलंका या स्पर्धेचे संयुक्त विजेते होते. तेव्हा अंतिम सामना पावसामुळं वाया गेला. तर, 2013 मध्ये टीम इंडियानं अंतिम सामन्यात इंग्लंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद जिंकलं होतं.
स्पर्धेसाठी सर्व संघ :
- भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
- बांगलादेश : नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), तौहीद हृदयॉय, सौम्या सरकार, तन्जीद हसन, महमुदुल्लाह, जाकेर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ हुसेन, नसुम अहमद, तन्झीम हसन आणि नाहिद राणा.
- न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), डॅरिल मिचेल, विल्यम ओ'रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नाथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग, जेकब डफी.
- पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अली आघा, उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.
Looking through the background of the Champions Trophy 💭, here are some important differences between this competition and the ICC Cricket World Cup 🏏🌎🏆.#WozaNawe #BePartOfIt #ChampionsTrophy pic.twitter.com/uottr7Ld3e
— Proteas Men (@ProteasMenCSA) February 18, 2025
- अफगाणिस्तान : हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झद्रान, रहमानउल्लाह गुरबाज, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, इकराम अलीखिल, गुलबदिन नायब, अझमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, नांग्याल खरोती, नूर अहमद, फजलहक फारुकी, फरीद मलिक, नवीद झद्रान.
- इंग्लंड : जॉस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, टॉम बँटन, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड.
- ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, अॅडम झांपा.
- दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, मार्को जानसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, कॉर्बिन बॉश.
Pakistan. Home soil. One mission – #ChampionsTrophy glory 🌟
— ICC (@ICC) February 17, 2025
In frame:
Mohammad Rizwan
Babar Azam
Naseem Shah
Shaheen Afridi pic.twitter.com/vqCyNrSrmG
चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक :
- मॅच 1 : 19 फेब्रुवारी, पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची
- मॅच 2 : 20 फेब्रुवारी, बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई
- मॅच 3 : 21 फेब्रुवारी, अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका
- मॅच 4 : 22 फेब्रुवारी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड
- मॅच 5 : 23 फेब्रुवारी, पाकिस्तान विरुद्ध भारत
- मॅच 6 : 24 फेब्रुवारी, बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड
- मॅच 7 : 25 फेब्रुवारी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका
- मॅच 8 : 26 फेब्रुवारी, अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड
- मॅच 9 : 27 फेब्रुवारी, पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश
- मॅच 10 : 28 फेब्रुवारी, अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया
- मॅच 11 : 1 मार्च, दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड
- मॅच 12 : 2 मार्च, न्यूझीलंड विरुद्ध भारत
- सेमीफायनल 1 : 4 मार्च,
- सेमीफायनल 2 : 5 मार्च
- अंतिम सामना : 9 मार्च
हेही वाचा :