पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून जीबीएस या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. शहरात या आजाराचे आजपर्यंत २०० हून अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील नांदेड गावात या आजाराचे रुग्ण वाढत असून त्या परिसरात असलेल्या विहिरीमुळं हे रुग्ण वाढत असल्याचं सांगितलं जातय. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठं विधान केलय.
कोंबड्यांच मांस खाल्ल्यानं जीबीएस? : अजित पवार म्हणाले, "खडकवासलात जे काही जीबीएसचे रुग्ण वाढले ते आपल्याला वाटलं की पाण्यामुळं वाढले. परंतु, या भागात काही नागरिकांचं म्हणणं आहे की कोंबड्यांचं मांस खाल्ल्यानं हा आजार झाला. याबाबत माहिती देखील घेण्यात आलीय. त्या परिसरातील कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज नसून फक्त ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजं, मांस कच्चं राहायला नको. तसच सध्या जीबीएसबाबत परिस्थिती आटोक्यात आलीय. नागरिकांनी घाबरून जाऊ नये". पुणे महापालिकेच्या ७५ व्यां वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे महापालिकेत भेट दिली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली.
आमच्यात काही वाद नाही : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्डवॉर सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत अजित पवार म्हणाले, "हे धादांत खोटं आहे. याबाबत ना फडणवीस यांनी सांगितलं, ना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तुम्हाला बातम्या नाही मिळाल्या की कोल्डवॉर, हॉटवॉर सुरू असल्याचं सांगतात. पण आमच्यात असं काहीही नाही. सगळं चांगलं चाललं आहे. आम्ही राज्याच्या भल्यासाठी पाऊल उचलत आहोत आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडू".
उबाठाचे प्रमुख यांना तो इशारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिकमध्ये मला हलक्यात घेऊ नका असं म्हटलं. याबाबत अजित पवार म्हणाले की, त्यांचा उबाठाचे प्रमुख यांना तो इशारा होता.
भेटीचा वेगळा अर्थ काढू नका : आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली असून यावर जोरदार राजकारण सुरू झालंय. याबाबत अजित पवार म्हणाले, "मुंडे हे मंत्री आहेत तर धस हे आमदार आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला आहे. त्यांचे पूर्वीपासूनचे संबंध असून या भेटीचा वेगळा अर्थ काढू नका"
हेही वाचा -