महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

आमदार अमोल मिटकरी यांची कार फोडणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू, पोलिसांकडून 50 जणांवर गुन्हा दाखल - Amol Mitkari Vs Raj Thackeray - AMOL MITKARI VS RAJ THACKERAY

Amol Mitkari Vs Raj Thackeray : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे अकोल्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी त्यांच्या कारची तोडफोड केली. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यानं मोठं वादंग निर्माण झाले आहे.

AMOL MITKARI VS MNS
AMOL MITKARI VS MNS (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 31, 2024, 10:53 AM IST

अकोलाAmol Mitkari Vs Raj Thackeray : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मंगळवारी मनसेच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अमोल मिटकरींच्या कारची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी मनसेचे पक्ष निरीक्षक आणि जिल्हा प्रमुखांसह 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेनंतर जय मालोकर यामनसे पदाधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.

गुन्हा दाखल : अमोल मिटकरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा निषेध म्हणून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृह येथे आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्यांना मारण्याचाही प्रयत्न झाला. मात्र कार्यकर्ते आणि पोलिसांनी त्यांना अडवलं. या घटनेनंतर आमदार अमोल मिटकरी यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी मनसेचे पक्षनिरीक्षक आणि जिल्हाप्रमुख यांच्यासह 13 पदाधिकारी आणि इतर 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल केला.

अमोल मिटकरींच ठिय्या आंदोलन : राज ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर कडाडून टीका केली. त्यांच्या कारची तोडफोड केली. या घटनेनंतर अमोल मिटकरी यांनी पोलीस स्थानक गाठलं. हल्ला करणाऱ्यांना जोपर्यंत अटक करण्यात येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा पवित्रा अमोल मिटकरी यांनी घेतला. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. पोलिसांनी मनसेचे जिल्हाप्रमुख पंकज साबळे तसेच पक्ष निरीक्षक कर्णबाळा दूनबळे, सचिन गालट, अरविंद शुक्ला, ललित यावलकर, जय मालोकर, मंगेश देशमुख, रुपेश तायडे, दीपक बोडखे, मुकेश धोंडफळे, गणेश वाघमारे, प्रशंसा अंभोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी, दंगलीचे गुन्हे, सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करने, लोकसेवकाची मालमत्तेचे नुकसान करणे, अनधिकृत प्रवेश करणे, भीती दाखवणे आणि मालमत्तेचे नुकसान करून धमकी देणे यासह हे गुन्हे दाखल करण्यात आले.

आरोपी जय मालोकर यांचा मृत्यू : अमोल मिटकरी यांच्यावर झालेला हल्ल्याचा प्रयत्न आणि वाहनावरील तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी जय मालोकर याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. या घटनेवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दुःख व्यक्त केलंय. आपण लवकरच जय मालोकार याच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं. " कार्यकर्त्यांच्या बळावर राजकारण करू पाहणाऱ्या राज ठाकरे यांनी आता या मृत मनसैनिकाच्या कुटुंबीयांना भेटायला यावं," असं आवाहन आमदार अमोल मिटकरी यांनी केलं.

  • दोघांना अटक : दरम्यान या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी मनसेचे जिल्हाप्रमुख पंकज साबळे आणि युवा प्रमुख सौरभ भगत या दोघांना रात्री अटक केली. पण त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हेही वाचा

  1. 'मनसे हा सुपारीबाज पक्ष...,' आदित्य ठाकरेंचा टोला - Aditya Thackeray Pune Visit
  2. विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपाकडून ठाकरेंची कोंडी? सावरकरांचा मुद्दा गाजण्याची शक्यता - BJP Election Campaign Savarkar
  3. "मुख्यमंत्री शिंदे मौलवीच्या वेशात दिल्लीला जाऊन...", वेषांतराच्या मुद्द्यावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut Criticism

ABOUT THE AUTHOR

...view details