ETV Bharat / state

लग्नाच्या आमिषानं महिलेला ओढलं जाळ्यात; शारीरिक शोषण करुन लुटला लाखोंचा ऐवज, पुण्याच्या भामट्याला कोल्हापुरात बेड्या - MAN PHYSICAL ABUSE TO WOMAN

विवाहस्थळावर झालेल्या ओळखीतून कोल्हापूरमधील महिलेला पुण्यातील भामट्यानं फसवल्याचं उघड झालं. या भामट्यानं महिलेचं लैंगिक शोषण करुन तिचं 11 तोळे सोनं आणि लाखो रुपये लुटले.

Man Physical Abuse to Woman
प्रतिकात्मक छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2025, 10:48 PM IST

कोल्हापूर : वधू- वर नोंदणी संकेतस्थळावर लग्न करू इच्छिणाऱ्या तरुणींशी ओळख वाढवून लग्नाचं अमिष दाखवत लैंगिक अत्याचार करणाऱ्या भामट्याला कोल्हापूर पोलिसांनी अखेर अटक केली. पुण्यातील फिरोज निजाम शेख असं या तरुणाचं नाव असून फसवणूक झालेल्या महिलांनी कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केलं आहे.

घटस्फोटीत महिलेला लावला लाखोचा चुना : पुणे कॅम्प येथे राहणाऱ्या फिरोज निजाम शेख या तरुणानं एका वधू वर नोंदणी संकेतस्थळावर स्वतःचा बायोडेटा अपलोड करून लग्नासाठी मुलींचा शोध घेत असल्याचं भासवत होता. कोल्हापूर जिल्ह्यातील एका घटस्फोटीत महिलेला दुसरं लग्न करायचे असल्याने तिने आपला बायोडेटा संबंधित नोंदणी संकेतस्थळावर अपलोड केला. यावरून फिरोज शेखने या महिलेचा मोबाईल नंबर मिळवून तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तो कोल्हापुरात येऊन या महिलेस आणि तिच्या नातेवाईकांना भेटला. त्यांनी आपण उच्चशिक्षित असून इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगितलं. या महिलेच्या कुटुंबाला खोटी माहिती सांगून त्याने या सर्वांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने सतत महिलेशी मोबाईलवर संपर्क साधला. वरचेवर कोल्हापुरात येऊन तिची भेट घेऊ लागला. महिलेचा विश्वास संपादन करत तिच्याकडील 11 तोळे दागिने आणि 1 लाख 69 हजारांची शेख याने उकळले. यानंतर मात्र फिरोज शेख हा या महिलेचे फोन घेण्यास टाळाटाळ करू लागला. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिरोज शेख विरुद्ध तक्रार नोंदवली. कोल्हापूर पोलिसांनी पुण्यात जाऊन फिरोज शेख याला ताब्यात घेऊन अटक केली.

जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित (Reporter)

मुंबईतील महिलेची फसवणूक केल्याचं समोर : मोबाईल वरून सोशल मीडिया साईट्स आणि संकेतस्थळावर लग्नाचा बायोडाटा अपलोड करून फिरोज शेख याने मुंबईतील एका महिलेची अशाच पद्धतीनं फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. सध्या सर्वत्र लग्नाचा सिझन सुरू असल्यानं अनेक नववधू आणि वर सोशल मीडिया आणि संकेतस्थळांचा वापर करत आहेत. मात्र या पद्धतीने शेख याने महिलेची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी "राज्यात अन्य कुणाची फसवणूक झाली असेल, तर तत्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधावा," असं आवाहन केलं आहे.

शारीरिक शोषण करुन लुटलं : कोल्हापूरच्या पीडित महिलेला आपल्या जाळ्यात ओढून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करत पीडितेला लुटलं. या नराधमानं मला ब्रेन ट्यूमर झाला आहे, उपचारासाठी पैसे हवे आहेत, असं कारण त्यानं सांगितलं. तसेच माझ्या घरावर प्राप्तिकर विभागाची कारवाई झाली आहे, या प्रकरणातून बाहेर येण्यासाठी मला पैशांची गरज आहे, असं सांगत शेख यानं या महिलेला वेळोवेळी फसवलं. सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 10 लाखांचा गंडा घातल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.

हेही वाचा :

चिमुकली अत्याचार हत्या प्रकरण : तिघांना ठोकल्या बेड्या, दाढी करून पेहराव बदलताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप

१५ वर्षीय प्रेयसीवर १९ वर्षीय प्रियकराचा बळजबरीने बलात्कार; दगाबाज प्रियकराला अटक

घर मालकाचा घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नराधम अटकेत

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.