मुंबई : साऊथ आणि हिंदी चित्रपटकसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार प्रकाश राज अनेकदा राजकीय बाबींवरही आपले मत मांडतात दिसतात. आता अलीकडेच त्यांनी ट्विटरवर सरकारच्या त्रिभाषिक धोरणावर आपला राग व्यक्त केला आहे. 2017 मध्ये, बंगळुरूतील प्रकाश राज यांची पत्रकार मैत्रीण गौरी लंकेश यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तेव्हापासून ते केवळ चित्रपटांमध्येच नव्हे तर राजकारणातही सक्रिय आहेत. प्रकाश राज हे देशात घडणाऱ्या प्रत्येक विषयावर आपले मत मुक्तपणे मांडत असतात. आता प्रकाश राज यांनी त्यांच्या अधिकृत अकाउंटवर त्रिभाषा भाषा धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या तमिळनाडूमध्येही त्रिभाषा धोरणावर मोठा विरोध केला जात आहे.
प्रकाश राजचं ट्विट चर्चेत : प्रकाश यांनी त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं, 'तुम्हाला हिंदी येते.. तुम्ही हिंदी बोलता.. तुम्ही आम्हालाही हिंदी बोलण्यास भाग पाडत आहात, पण हा हास्यास्पद खेळ आमच्याबरोबर चालणार नाही.' केंद्र सरकारच्या शिक्षण अभियान योजनेअंतर्गत तामिळनाडूला कोणताही निधी देण्यात आलेला नाही. तामिळनाडू सरकारच्या विनंतीनंतरही केंद्र सरकारनं ही रक्कम उपलब्ध करून दिली नसल्याचं माहिती समोर आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विधानाचा तामिळनाडू सरकार निषेध करत आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात त्रिभाषा धोरण लागू झाल्यावरच निधी दिली जाईल.
त्रिभाषा धोरणबद्दल केलं जात आहे ब्लॅकमेल : तामिळनाडू राज्यामध्ये तमिळ आणि इंग्रजी या दोनच भाषांना महत्त्व दिले जाते. राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही त्रिभाषा धोरणाचा निषेध केला आहे. याशिवाय त्यांनी हे सांगितलं आहे की, त्रिभाषा धोरण स्वीकारण्यासाठी त्यांना ब्लॅकमेल केले जात आहे. तसेच हे धोरण स्वीकारले नाही तर, निधी दिली जाणार नाही असं देखील म्हणण्यात आलं आहे. दरम्यान प्रकाश राजच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता सध्या ते 'थलापथी', विजय यांचा शेवटचा चित्रपट 'जननायक' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.