मुंबई : अभिनेत्री राखी सावंत हिला महाराष्ट्र सायबर सेलनं समन्स बजावलं असून 27 तारखेला चौकशी साठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. रणवीर अलाहाबादिया याला 24 फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र सायबर सेलचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी ही माहिती दिली. इंडिया गॉट लेटेंट या शो मध्ये आक्षेपार्ह विनोद केल्यामुळे यूट्युबर रणवीर अलाहाबादिया याच्यासह समय रैना, अपूर्वा मुखिजा, आशीष चंचलानी आदींना महाराष्ट्र सायबर सेलनं समन्स बजावले होतं. या प्रकरणात गुवाहाटी आणि मुंबई येथे 2 गुन्हे दाखल झाले आहेत. त्याची चौकशी महाराष्ट्र सायबर सेल करीत आहे. इंडिया गॉट लेटेंट या शोच्या ज्या भगांबाबत चौकशी करण्यात येत आहे, त्याच्याशी संबंधित सर्वांविरोधात गुन्हे दाखल केल्याची माहिती यशस्वी यादव यांनी दिली.
राखी सावंतचा जबाब नोंदवणार - याप्रकरणात आता राखी सावंत हिलादेखील समन्स बजावण्यात आला असून 27 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. 27 तारखेला तिचा जबाब नोंदविण्यात येईल. इंडिया गॉट लेटेंटच्या वादग्रस्त शोमध्ये तिचा सहभाग नव्हता किंवा ती परीक्षक नव्हती. मात्र, एका भागामध्ये ती पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. रणवीर अलाहाबादिया आणि आशीष चांचलानी यांनाही 24 फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.
समय रैनाची विनंती फेटाळली - समय रैना हा त्याच्या शो साठी परदेश दौऱ्यावर आहे. तो मार्च महिन्यात परत येणार आहे. त्यामुळे त्यानं वेळ देण्याची विनंती केली होती. मात्र, सायबर सेलनं ती फेटाळली. त्याला राष्ट्रीय महिला आयोगानं 11 मार्च रोजी हजर राहण्यास सांगितलं आहे. रणवीर अलाहाबादियालाही सुप्रिम कोर्टानं फटकारलं होतं. त्याच्या मनात घाणं असल्याचा शेरा त्याच्यावर मारण्यात आला होता. मात्र अनेक ठिकाणी नोंद झालेल्या तक्रारींसाठी त्याला अटक न करण्याचा दिलासा कोर्टानं दिला होता. ही केस सुरू असताना यापुढं त्याला देश सोडून कुठंही जाता येणार नाही. त्याचा पासपोर्टही जमा करण्याचा आदेश त्याला तकोर्टाकडून देण्यात आलाय.
हेही वाचा -