कराची Oledst Player to Take wicket in Champions Tropy : कराचीतील नॅशनल बँक स्टेडियमवर अफगाणिस्तानचा अनुभवी खेळाडू मोहम्मद नबीनं एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 40 वर्षीय नबी आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात विकेट घेणारा तिसरा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. विशेष म्हणजे त्यानं त्याच्या पहिल्याच चेंडूवर ही कामगिरी केली आहे. या बाबतीत त्यानं अमेरिकेच्या हॉवर्ड जॉन्सन आणि नेदरलँड्सच्या रोलँड लेफेबवरे यांना मागे टाकलं आहे.
𝙂𝙀𝙉𝙄𝙐𝙎 𝙉𝘼𝘽𝙄 𝙎𝙏𝙍𝙄𝙆𝙀𝙎! 🧠🔥#ChampionsTrophyOnJioStar 👉 #AFGvSA, 𝗟𝗜𝗩𝗘 𝗡𝗢𝗪 𝗼𝗻 𝗦𝘁𝗮𝗿 𝗦𝗽𝗼𝗿𝘁𝘀 𝟮 & 𝗦𝗽𝗼𝗿𝘁𝘀 𝟭𝟴-𝟭 !
— Star Sports (@StarSportsIndia) February 21, 2025
A moment of brilliance as Nabi outfoxes De Zorzi and sends him packing! 🎯 pic.twitter.com/8RPCIjSKQ7
विकेट घेणारा तिसरा सर्वात वयस्कर खेळाडू : 19 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान-न्यूझीलंड सामन्यानं चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात झाली. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना 20 फेब्रुवारी रोजी झाला. तर 21 फेब्रुवारी रोजी कराचीतील नॅशनल स्टेडियमवर ग्रुप बी मधील अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना सुरु आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टोनी डी झोर्जी आणि रायन रिकेलटन प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आले. पण झोर्जी स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. नबीनं त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं. दक्षिण आफ्रिकेनं 5 षटकांत 28 धावा केल्या होत्या. नबीनं सहावा षटक टाकला, जो त्याचा पहिलाच षटक होता. पहिल्याच चेंडूवर नाबीनं एक उत्तम कामगिरी केली. नबीच्या पहिल्याच चेंडूवर झोर्जीनं मिड-ऑनच्या दिशेनं शॉट खेळला पण अझमतुल्लाह उमरझाईनं चेंडू पकडला आणि झोर्जीचा डाव 11 चेंडूत 11 धावांवर संपला.
Players aged 40-plus on Champions Trophy debut -
— Machaao For Cricket (@MachaaoApp) February 21, 2025
42y 284d - Donovan Blake (USA) vs AUS, Southampton, 2004
42y 154d - Tony Reid (USA) vs NZ, The Oval, 2004
40y 318d - Mark Johnson (USA) vs NZ, The Oval, 2004
40y 51d - Mohammad Nabi (AFG) vs PAK, Karachi, 2025
40y 25d - Howard…
अमेरिकेचा खेळाडू अव्वल स्थानी : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विकेट घेणारा नाबी आता तिसरा सर्वात वयस्कर गोलंदाज (वय 40 वर्षे 51 दिवस) आहे. या प्रकरणात पहिल्या क्रमांकावर अमेरिकेचा टोनी रीड आहे, ज्यानं 2004 मध्ये 42 वर्षे आणि 154 दिवसांच्या वयात न्यूझीलंडविरुद्ध ही कामगिरी केली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी खेळाडू सनथ जयसूर्या (वय 40 वर्षे 89 दिवस) आहे. नबीनं हॉवर्ड जॉन्सन (वय 40 वर्षे 28 दिवस) आणि रोलँड लेफेबव्रे (39 वर्षे 221 दिवस) यांना मागे टाकलं आहे.
Oldest to take wicket in Champions Trophy
— CricTracker (@Cricketracker) February 21, 2025
42y 154d - Tony Reid vs New Zealand, The Oval, 2004
40y 89d - Sanath Jayasuriya vs New Zealand, Johannesburg, 2009
40y 51d - Mohammad Nabi vs South Africa, Karachi, 2025
40y 28d - Howard Johnson vs Australia, Southampton, 2004
39y 221d -… pic.twitter.com/ggTZ3BhUZJ
अफगाणिस्तान पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीत : चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात 1998 मध्ये झाली. 2017 पर्यंत, याच्या आठ आवृत्त्या झाल्या होत्या, आता पाकिस्तान नवव्या हंगामाचं आयोजन करत आहे. यामध्ये आठ संघांचा समावेश आहे. अफगाणिस्तान पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळत आहे. या खास आणि मोठ्या प्रसंगी, नबीनं पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली.
हेही वाचा :