ETV Bharat / state

माझ्या मुलाला न्याय द्या...; वाल्मिक कराडच्या आईचा परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या - WALMIK KARAD

केज न्यायालयानं वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. तर आता लेकाच्या न्यायासाठी वाल्मिक कराडच्या आईंनी सुध्दा परळी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या मांडला आहे.

Parubai Baburao Karad
पारुबाई बाबुराव कराड (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2025, 8:31 PM IST

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. या अनुषंगानं आवादा कंपनीच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडवर (Walmik Karad) आरोप करण्यात आले आहेत. मात्र वाल्मिक कराडवर अन्याय होत असून माझ्या मुलाला न्याय द्या, अशी मागणी करत त्यांच्या आईनं परळी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. "दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा खोटा गुन्हा असून गलिच्छ राजकारणापायी माझ्या मुलावर अन्याय केला जात आहे. त्याच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या आणि माझ्या मुलाला न्याय द्या," अशी मागणी वाल्मिक कराडच्या 75 वर्षीय आई पारुबाई बाबुराव कराड (Parubai Baburao Karad) यांनी केली आहे.

वाल्मिक कराडच्या आईची तब्येत अचानक बिघडली : बीडमध्ये वाल्मिक कराडला न्याय मिळावा म्हणून समर्थक आक्रमक झाले. तर आईही रस्त्यावर उतरली. त्यातच वाल्मिक कराडच्या आईची तब्येत अचानक बिघडली. कराडची आई पारुबाई यांची प्रकृती बिघडल्यानं त्या रस्त्यात चक्कर येऊन पडल्या. त्यामुळं परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.

वाल्मिक कराडच्या आईचा परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या (ETV Bharat Reporter)

पोलीस ठाण्यासमोर ठिय्या : जमलेल्या समर्थकांनी वाल्मिक कराडच्या आईंना पाणी दिलं, रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र मुलाला न्याय मिळावा, म्हणून त्या सतत्यानं मागणी करत असल्याचं दिसत आहे. खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या आईनं आता न्यायायासाठी परळीतील शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत मुलाला न्याय देण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडं कराड यांच्या कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन सुरू केलं आहे. वाल्मिक कराडला आज केजच्या न्यायालयात हजर करण्यात आलं.

हेही वाचा -

  1. वाल्मिक कराडला न्यायालयाचा दणका; 14 दिवसांची ठोठावली न्यायालयीन कोठडी, कोर्टात काय घडलं?
  2. महाविकास आघाडीत फक्त देशपातळीवर एकत्र लढण्याची चर्चा; शरद पवारांची वादावर मध्यस्थी, अमित शाहांवर हल्लाबोल
  3. दोषी सत्ताधारी पक्षाचा असला तरी त्याच्या विरोधात कारवाई करणार, अजित पवार कडाडले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.