ETV Bharat / politics

'उद्धव ठाकरेंची 'या' अध्यक्षपदावरुन मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करावी', शिवसेनेच्या बैठकीत ठराव मंजूर - BALASAHEB THACKERAY MEMORIAL

दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा उद्धव ठाकरे यांना कोणताही अधिकार नाही. त्यांची हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2025, 11:00 PM IST

Updated : Jan 13, 2025, 11:09 PM IST

मुबई : शिवसेना पक्षातील नेते आणि उपनेते यांची महत्वाची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीला लोकसभेतील शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते, खासदार तसेच अन्य नेते उपस्थित होते. दरम्यान, बैठकीत संघटनात्मक आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीबाबत सुद्धा चर्चा झाली. 23 तारखेला मुंबईच्या बीकेसीमध्ये भव्य मेळावा पार पडणार आहे. त्या मेळाव्यात शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार यांचा भव्य सत्कार केला जाईल. तसेच मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सत्कार सुद्धा करण्यात येणार आहे. 23 तारखेला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

प्रतिक्रिया देताना रामदास कदम (ETV Bharat Reporter)

उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करावी : पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे. शिवसेनेच्या विचारधारेला काळीमा फासण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आम्ही 45 वर्ष मातोश्री जवळून पाहिली आहे. ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचाराला हरताळ फासली, लाचारी पत्करून उद्धव ठाकरे हे काँग्रेस सोबत गेले. त्या उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा अजिबात अधिकार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ शासन म्हणून उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी", असा ठराव आज बैठकीत मंजूर केला आहे.

सर्व शाखाप्रमुखांची नवीन नियुक्ती करणार : मुंबईतील सर्व शाखाप्रमुख आणि सर्व पदं रिक्त करून नवीन नियुक्ती केल्या जातील. मुलाखती घेऊन तशा प्रकारची नियुक्ती केली जाईल. कोणी कशाप्रकारे काम केलं आहे याचा आढावा समिती घेऊन नियुक्त्या करतील. गिरगाव, दादर अशाप्रकारे समित्या गठीत केल्या जातील. ज्या समितीला जे नाव योग्य वाटेल ते नाव ती समिती एकनाथ शिंदे यांना कळवले जाईल. त्यानंतर एकनाथ शिंदे हे त्याबाबत निर्णय घेऊन नियुक्त्या करतील असा निर्णय आजच्या बैठकीत झाला. त्यानंतर 24 तारखेपासून 29 तारखेपर्यंत आपण सभासद नोंदणी करत आहोत. सभासद नोंदणीची मोहीम सुद्धा मुंबईत घेत आहेत. आतापर्यंत सगळ्यात मोठी सभासद नोंदणी होईल असा विश्वास मला वाटतोय, असं यावेळी रामदास कदम म्हणाले.

आता कितीही भीक मागितली तरी ...: आगामी पालिकेबद्दल एकनाथ शिंदे निर्णय घेतील. शिवसेना-भाजपा अशी आमची युती आहे. आमच्या युतीमध्ये अजिबात मतभेद नाहीत. कोणी आमच्या युतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तरीही आमची युती राहील. उद्धव ठाकरे यांना आता भीती वाटायला लागली. उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत नरेंद्र मोदी अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत बोललं आहे. मला ते सांगायला सुद्धा लाज वाटते इतका खालच्या पातळीत उद्धव ठाकरे बोलले आहेत. त्यांचा पिल्लू तीनवेळा फडणवीस यांना जाऊन भेटलं. उद्धव ठाकरेंना आता पंतप्रधानांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. आता कितीही भीक मागितली तरीही उपयोग नाही अशी टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

हेही वाचा -

Last Updated : Jan 13, 2025, 11:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.