ETV Bharat / politics

मोठी बातमी! वाल्मिक एसआयटीकडून कराडवर मकोकाचा प्रस्ताव, कोर्टात काय घडलं? - WALMIK KARAD MCOCA

खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली. तर आता कराडवर मकोका प्रस्तावित करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

Walmik Karad
वाल्मिक कराड (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2025, 3:47 PM IST

Updated : Jan 14, 2025, 8:54 PM IST

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाकडं राज्याचं लक्ष लागलं असून, याप्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सर्वच आरोपींना अटक केली. त्यांच्यावर मोकोकांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात जाहीर केल्यानुसार आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, याप्रकरणात मास्टरमाईंड असल्याचा आरोप झालेल्या वाल्मिक कराडवर (Walmik karad) अद्यापही खुनाचा गुन्हा दाखल झाला नाही. पण, एसआयटीकडून आज वाल्मिक कराडवर देखील मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय. खंडणी प्रकरणात पोलीस कोठडी संपल्यानंतर वाल्मिक कराडला आज केज न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय खोलात गेला आहे.

वाल्मिक कराडवर मकोका प्रस्तावित : वाल्मिक कराडवर मकोका प्रस्तावित करण्यात आला आहे. मकोका लागू केल्यानंतर सीआयडी कोठडीची मागणी केली जाणार आहे. सरपंच संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडवर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह, गावकऱ्यांनीही वाल्मिक कराडवर मकोका लावण्याची मागणी केली. मंगळवारी वाल्मिक कराडला केज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर आता त्याच्यावर मकोका प्रस्तावित करण्यात आला, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. यावेळी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रतिक्रिया देताना वाल्मिक कराडचे वकील (ETV Bharat Reporter)

काय म्हणाले वकील सिद्धेश्वर ठोंबरे ? : "आज कोर्टापुढं युक्तीवाद झाला. त्यांनी 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. त्यामध्ये त्यांनी 10 मुद्दे घेत त्याच 10 मुद्द्यांवर पोलीस कोठडी मागितली. त्यावर 31 डिसेंबरला 15 दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्यापैकी पुन्हा तेच 10 मुद्दे सांगत त्यांनी इतर गुन्ह्यात तपास करायचा आहे, प्रॉपर्टी चेक करायची असं सांगितलं. त्यामुळं कोर्टानं आज दोन्ही सरकारी वकील आणि आमचा युक्तीवाद ऐकला आणि कोर्टानं त्यांचा पोलीस कोठडी मागण्याचा अर्ज फेटाळला आहे. तसंच न्यायालयीन कोठडी दिली आहे. आतापर्यंतच्या तपासात दुसऱ्या गुन्ह्यात तपास करायचा आहे, असं सांगण्यात आलं. मात्र तपासात कुठंही वाल्मिक कराडचा सहभाग आढळला नाही, हे आम्ही कोर्टाला सांगितलं आहे", असं वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी सांगितलं.

कोर्टातील सुनावणीत कराडवर मकोका : वाल्मिक कराड याला सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. आज कोर्टात त्याला हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. तर, कराडच्या वकिलाने विरोध केला. कोर्टातील सुनावणीत कराडवर मकोका लावण्यात आला असल्याचं समोर आलं. त्यामुळे वाल्मिक कराड हा आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

"आज जो न्यायालयात युक्तीवाद झाला त्यामध्ये सीआयडीच्या दुसऱ्या तपासणीसाठी पुन्हा वाल्मिक कराडला ताब्यात घेतलं आहे. वाल्मिक कराडचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही. बुधवारी त्यांना कोर्टात हजर केलं जाईल, त्या गुन्ह्याचा कुठेही संबंध नाही. हे ओढून ताणून गुन्हा लावणं चुकीचं आहे. त्यांची सर्व कागदपत्रे आम्हाला मिळू द्या. आम्ही तुम्हाला त्याची पुढची दिशा काय आहे ते सांगू. त्यासंदर्भात आमच्याकडं कुठलेही कागदपत्रे नाहीत. त्याच्यामध्ये रिमांड मिळेल आम्ही ते न्यायालयाकडं सादर करू. यामध्ये 29 डिसेंबर 2024 ला त्यांनी खंडणी मागितल्याचा दावा त्यांनी केला. यामध्ये कुठंही वाल्मिक कराड यांनी खंडणी मागितल्याचं दिसून आलेलं नाही. वाल्मिक कराडचं या गुन्ह्यामध्ये कुठलंही नाव नाही. यामध्ये आम्हाला कुठलीही माहिती दिली जात नाही. वाल्मिक कराडला उद्या न्यायालयात हजर करतील, त्याबाबत आम्ही पुढची कारवाई काय करायची ते ठरवू." - सिद्धेश्वर ठोंबरे, वाल्मिक कराडचे वकील

धनंजय देशमुख यांच ‘शोले स्टाईल’ आंदोलन : संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला. मात्र, अजूनही एक आरोपी फरार आहे. तर वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी धनंजय देशमुख यांनी केलीय. यानंतर आज धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केलं. यावेळी मनोज जरांगे पाटील, खासदार बजरंग सोनवणे, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत घटनास्थळी उपस्थित होते.

हेही वाचा -

Last Updated : Jan 14, 2025, 8:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.