महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयरामचे निधन, रस्ता अपघातात जागीच मृत्यू - Pavitra Jayaram passed away - PAVITRA JAYARAM PASSED AWAY

Pavitra Jayaram passed away : तेलुगू टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयरामचा रस्ता अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यात घडली आहे. ती बंगळुरूहून काल रात्री हैदराबादला परतत होती. या भीषण अपघातात तिच्या कारचा चालक आणि तिचा भाऊही गंभीर जखमी झाला आहे.

Etv BharatPavitra Jayaram passed away
पवित्रा जयराम (Pavitra Jayaram Instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 3:45 PM IST

महबूबनगर (तेलंगणा) - Pavitra Jayaram passed away : 'त्रिनयणी' या हिट तेलुगू टीव्ही मालिकेमध्ये थिलोत्तमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पवित्रा जयराम हिचं तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यात एका रस्ते अपघातामध्ये निधन झालं. रविवारी बेंगळुरूहून हैदराबादला परतत असताना महबूबनगर जिल्ह्यातील दिविटिपल्ली येथे झालेल्या अपघातात जयरामचा जागीच मृत्यू झाला, असल्याचे पोलिसांनी सांगितलं.

अभिनेता समीप आचार्य इन्स्टग्राम स्टोरी (Actor Sameep Acharya Instagram Story)

भूतपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महबूबनगर जिल्ह्यातील दिविटिपल्ली येथे काल रात्री 1 वाजता एका रस्ता अपघातात तिचा मृत्यू झाला. ती बेंगळुरूहून हैदराबादला परतत होती. तिच्या कारवरील नियंत्रण सुटलं आणि ती दुभाजकाला धडकली आणि नंतर एका बसने तिच्या वाहनाला धडक दिली, असे पोलिसांनी सांगितलं. या अपघातात पवित्रा जयराम यांचा मृत्यू झाला, तर तिचा चुलत भाऊ आणि चालक या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती मिळत आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा सुरू आहे.

अभिनेता समीप आचार्यने अभिनेत्री पवित्रा जयराम च्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यानं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये लिहिले, "तू आता नाहीस या बातमीनं जाग आली. हे पटण अशक्य आहे. माझी पहिली ऑन-स्क्रीन आई, माझ्यासाठी तू नेहमीच खास राहशील."

अभिनेत्री पवित्रा जयरामने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात कन्नड टीव्ही इंडस्ट्रीतील 'जोकली' या मालिकेतून केली. 2018 मध्ये, तिनं 'निन्ने पेल्लादथा' मधून तेलुगू टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं. 'तिलोत्तमा' या टीव्ही सीरियलने तिने तेलुगू भाषा बोलणाऱ्या घराघरात लोकप्रियता मिळवली. त्याशिवाय तिनं इतर दक्षिण भारतीय भाषांमध्ये काम केलं होतं. पवित्राने तेलगू मालिकांमध्येही तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या निधनाने मनोरंजन उद्योगाला मोठा धक्का बसला असून, तिचे सहकारी आणि चाहते दु:खात आहेत.

हेही वाचा -

  1. सारा अली खान आणि अमृता सिंग यांचा क्यूट इब्राहिम अली खानबरोबरचा फोटो व्हायरल, दिसली तैमूरची झलक - Sara Ali khan share pic
  2. अल्लु अर्जुननं हैदराबादमध्ये केलं मतदान, वायएसआर काँग्रेसला पाठिंब्याबद्दल सोडलं मौन - Lok Sabha Election 2024
  3. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं नीतू कपूर आणि सोनी राजदानबरोबर मदर्स डे केला साजरा - Alia Bhatt Ranbir Kapoor

ABOUT THE AUTHOR

...view details