मुंबई - अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसणारा आरोपी मोहम्मद शरीफुल शहजाद अखेर पकडला गेला आहे. सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर त्याच्या घरातून पळून जाण्यात यशस्वी झालेला आरोपीनं आपली ओळख लपवण्यासाठी वारंवार प्रयत्न केले. सुमारे 3 दिवसांच्या प्रयत्नांनंतर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाली. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी शहजादला 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. शहजादनं सैफ अली खानवर कसा हल्ला केला असणार? हा प्रश्न अनेकांना पडत आहेत.
शहजादनं सैफ अली खानवर कसा केला हल्ला : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं शरीर सडपातळ आहे. याशिवाय सैफ अली खान तगडा आणि जास्त उंचींचा आहे. त्यानं सैफवर कसा वार केला आणि त्याला कसं रक्तबंबाळ केलं, हा प्रश्न आता निर्माण होत आहे. आम्ही तुम्हाला या चोराबद्दल एक विशेष माहिती देणार आहोत. हा चोर बांग्लादेशात स्पोर्ट्समध्ये होता. हे आता प्राथमिक तपासात माहित झालं आहे. हा चोर कुस्ती खेळायचा आणि यामुळेच तो अभिनेत्याला मारण्यात यशस्वी झाला. सध्या मुंबई पोलीस त्याच्या दाव्यांची चौकशी करत आहेत.
मुंबई पोलिसांनी दिली माहिती : दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद शरीफुल शहजाद वरळी येथे, ज्या क्लबमध्ये काम करत होता, तिथे त्यानं एका कस्टमरची अंगठी चोरण्याचा प्रयत्नही केला होता, याप्रकरणी त्याला पकडण्यात आलं होतं. त्यावेळी कस्टमरनं कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. मात्र त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यानं चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान सैफ अली खानच्या कुटुंबाच्या सुरक्षेबद्दल बोललायचं झालं तर, त्याच्या घराजवळ सध्या पोलीस तैनात आहेत. याशिवाय रुग्णालयाच्या गेटवर आणि वार्डच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था केली गेली आहे. तसेच करीना कपूरबरोबर एक पोलिस रक्षकही तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा :