ETV Bharat / state

अक्षय शिंदेच्या घरावर खासगी बँकेची नोटीस; काय आहे नेमकं प्रकरण? - AKSHAY SHINDE ENCOUNTER CASE

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या (Akshay Shinde) घरावर बँकेनं नोटीस लावली आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 20, 2025, 9:59 PM IST

Updated : Jan 20, 2025, 10:55 PM IST

ठाणे : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या (Akshay Shinde) घरावर बँकेनं नोटीस बजावली आहे. त्याच्या वडिलांनी खासगी बँकेकडून कर्ज घेतलं होतं. घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्यामुळं बँकेनं नोटीस घराच्या दाराला चिकटवली आहे.

घरावर 2 लाख 50 हजार रुपयांचं कर्ज : मिळालेल्या माहितीनुसार, मृत अक्षय शिंदेच्या वडिलांनी खासगी बँकेकडून राहत्या घरावर 2 लाख 50 हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. या कर्जाची काही परत फेड केल्यानंतर बदलापूर अत्याचार प्रकरण घडलं. त्यानंतर शिंदे कुटुंब अज्ञात ठिकाणी वास्तव्याला गेले. त्यांना कामधंदाही नसल्यामुळं त्यांच्या कर्जाचे हप्ते देखील थकले. त्यामुळं बँकेने 60 दिवसाच्या आत थकीत भरणा भरावा अशी नोटीस दारावर चिटकवली आहे.

अक्षय शिंदेच्या घरावर खाजगी बँकेची नोटीस (ETV Bharat Reporter)

पोलीस कर्मचारी अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी जबाबदार? : अक्षय शिंदेला बदलापूरच्या दिशेने नेत असताना त्याने मुंब्रा बायपासनजीक गाडीतच पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली. यामधून त्यानं पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र, चौकशी अहवालात अक्षय शिंदेला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. या बनावट चकमकीतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केला. त्यामुळं हे पाच पोलीस कर्मचारी अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत, असं संबंधित अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

हेही वाचा -

  1. पहिल्या पत्नीवरील बलात्कार प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोपीला घेवून जात होते पोलीस अन् रंगला थरार - Accused Akshay Shinde Death
  2. बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम एन्काउंटरमध्ये ठार; पोलिसांनी घातली गोळी अन् 'गेम फिनिश' - Badlapur Rape Accused Encounter
  3. बदलापूर घटनेवरून राजकारण तापलं; विरोधकांकडून राजकारण केलं जात असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप - Badlapur School Girls Case

Last Updated : Jan 20, 2025, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.