मुंबई - Sushmita Sen Ex Boyfriend Rohman :बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. काही दिवसांपूर्वीच रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टवर सुष्मिता सेननं तिच्या आयुष्याशी संबंधित खुलासे केले होते. यादरम्यान तिनं सांगितलं होतं की, ती 3 वर्षांपासून सिंगल असून ब्रेकअपचा आनंद घेत आहे. आता रोहमननं सुष्मिताबरोबरच्या नात्याबद्दल एक खुलासा केला आहे. मॉडेल-अभिनेता रोहमनला अलीकडेच एका संवादादरम्यान त्याच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं, यावर त्यानं म्हटलं, "आम्ही 6 वर्षांपासून एकत्र आहोत. यात नवीन काय आहे? आम्ही नेहमीच मित्र होतो आणि कायम राहू. आम्ही खूप काही शेअर करतो आणि सर्वकाही स्पष्ट आहे."
रोहमन शॉलनं केला खुलासा : जेव्हा सुष्मिता रियाच्या पॉडकास्टवर आली तेव्हा तिनं म्हटलं होतं की, "माझ्या आयुष्यात कोणताही व्यक्ती नाही. मी गेल्या काही काळापासून सिंगल आहे. मला सध्या कोणामध्ये इन्स्ट्रेट नाही. ब्रेक घेणे चांगले आहे, कारण मी या आधी सुमारे 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते." सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले होते, मात्र काही काळानंतर दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. याबद्दल त्यांनी आपल्या चाहत्यांना देखील एक पोस्टद्वारे सांगितलं होतं. या दोघांनी डिसेंबर 2021 मध्ये एक पोस्ट देखील शेअर केली होती. या पोस्टमध्ये लिहिलं होतं, "आम्ही आमच्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून केली होती. आम्ही मित्रच राहू. आमचे नाते फार पूर्वीच संपले, पण प्रेम अजूनही आहे."