नवी दिल्ली IPL Dates and Vennues : आयपीएल 2025 ची सुरुवात 22 मार्च रोजी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यानं होईल. हा सामना कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाईल तर आयपीएल 2025 चा अंतिम सामनाही 25 मे रोजी त्याच मैदानावर खेळला जाईल. पीटीआयच्या वृत्तानुसार, यावर्षीही काही आयपीएल सामने धर्मशाळा आणि गुवाहाटी इथं होणार आहेत. मुल्लानपूर नंतर धर्मशाळा हे पंजाब किंग्जचं दुसरं होम ग्राउंड असेल तर राजस्थान रॉयल्स जयपूर व्यतिरिक्त गुवाहाटीमध्येही सामने खेळतात.
🚨 CHENNAI vs MUMBAI AT CHEPAUK 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) February 15, 2025
- Chennai Super Kings is likely to host Mumbai Indians on March 23rd, Sunday. [Espn Cricinfo] pic.twitter.com/7pkRsb9kfK
10 पेक्षा जास्त ठिकाणी खेळवले जातील सामने : पीटीआयनं दिलेल्या अहवालानुसार श्रेयस आणि रिकी पॉन्टिंग यांच्या रुपात नवीन कर्णधार आणि प्रशिक्षक असलेल्या पंजाब किंग्जचा संघ धर्मशाळेत त्यांचे तीन घरचे सामने खेळतील. हिमाचल प्रदेशच्या सुंदर मैदानावर दर हंगामात खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांपेक्षा हे एक जास्त आहे. तसंच त्यांचे उर्वरित चार घरचे सामने पंजाबमधील मुल्लानपूर इथं खेळले जातील. 10 संघांची ही लीग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर 12 दिवसांनी 22 मार्च रोजी सुरु होईल आणि 12 ठिकाणी खेळवली जाईल. मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरु, मुल्लानपूर, लखनऊ, दिल्ली, अहमदाबाद, जयपूर, हैदराबाद, गुवाहाटी आणि धर्मशाळा या 12 शहरांत आयपीएलचे सामने होण्याची शक्यता आहे.
लवकरच जाहीर होणार वेळापत्रक : बीसीसीआयनं अद्याप आयपीएल 2025 चं वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. परंतु संपूर्ण वेळापत्रक पुढील आठवड्याच्या सुरुवातीला जाहीर होण्याची अपेक्षा आहे. गेल्या हंगामातील अंतिम फेरीतील संघ सनरायझर्स हैदराबाद 23 मार्च रोजी दुपारी घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. तर पाच वेळा विजेता चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2025 मध्ये 23 मार्च रोजी एमए चिदंबरम स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानं आपली मोहिम सुरु करेल.
IPL 2025 SCHEDULE 🚀 [Espn Cricinfo]
— Johns. (@CricCrazyJohns) February 15, 2025
First match: RCB vs KKR at Eden.
Second match: SRH vs RR at Hyderabad.
Third match: CSK vs MI at Chepauk. pic.twitter.com/Z1T3VQAUU9
केकेआरच्या कर्णधाराची लवकरच घोषणा : या हंगामात चेन्नईचं नेतृत्व ऋतुराज गायकवाड करेल तर मुंबईचं नेतृत्व हार्दिक पंड्या करेल. श्रेयस अय्यर पंजाब किंग्जमध्ये गेल्यानंतर, केकेआरनं अद्याप कर्णधाराची घोषणा केलेली नाही. आरसीबीचं नेतृत्व फाफ डु प्लेसिसऐवजी रजत पाटीदारकडे असेल. गेल्या वर्षी मेगा लिलाव झाला होता, त्यामुळं आयपीएल 2025 ची आतुरतेनं वाट पाहिली जात आहे. या लिलावात ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू ठरला. पंतला लखनऊ सुपर जायंट्सनं विक्रमी 27 कोटी रुपयांना खरेदी केलं. ऋषभ पंतला नुकतंच लखनऊचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं.
हेही वाचा :