ETV Bharat / state

साताऱ्यात शिवजयंती दिमाखात साजरी, मिरवणुकीत मर्दानी खेळांचा थरार, पाहा व्हिडिओ - SHIVAJI MAHARAJ JAYANTI 2025

साताऱ्यात शिवजयंती दिमाखात साजरी झाली. तसंच जिल्ह्यात सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
साताऱ्यात शिवजयंती साजरी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2025, 8:03 PM IST

सातारा : भगवे ध्वज, पताका, ढोल-ताशांचा गजर, रांगोळ्यांचा सडा, पोवाडे, लेझीम, झांजपथक, घोडेस्वार मावळे आणि मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी राजधानी साताऱ्यात शिवजयंती उत्सव दिमाखात साजरा झाला. प्रशासनाच्या वतीनं साताऱ्यातून 'जय शिवाजी, जय भारत' पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत लहान मुलांनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं सादर करून अंगावर रोमांच उभे केले.

प्रशासनाच्या वतीनं भव्य पदयात्रा : शासनाच्यावतीनं पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोवई नाक्यावरील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर प्रशासनाच्या वतीनं गांधी मैदानावरून 'जय शिवाजी, जय भारत' पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसंच चौकाचौकात शिवकालीन खेळांचं प्रदर्शन करण्यात आलं. लेझीम, झांज पथक, सांस्कृतिक कार्यक्रम, घोडेस्वार, पोतराज आणि मावळ्यांच्या वेशातील मुलं पदयात्रेत सहभागी झाली होती. जिल्हा क्रीडा संकुलात पदयात्रेची सांगता झाली.

साताऱ्यात शिवजयंती दिमाखात साजरी (ETV Bharat Reporter)

पदयात्रेत आरोग्याचा जागर : साताऱ्यात काढण्यात आलेल्या पदयात्रेत आरोग्याचा जागर पाहायला मिळाला. गांधी मैदानावर एचआयव्ही आजाराबाबत कलापथाकच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तसेच जीबीएस आजाराविषयी माहिती देण्यात आली. या आजाराबाबत नागरीकांनी काय काळजी घ्यावी, याचं मार्गदर्शन करण्यात आलं.

शेकडो मशालींनी उजळला अजिंक्यतारा : शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अजिंक्यतारा किल्ल्यावर भव्य मशाल महोत्सव पार पडला. यावेळी शेकडो मशालींनी अजिंक्यतारा किल्ला उजळून निघाला. ढोल-ताशांचा गजर आणि हलगीच्या कडकडाटात मशाली पेटवण्यात आल्यानंतर किल्ल्याच्या तटबंदीवरून शिवगर्जना झाली. शिवाजी महाराजांच्या जयजयकारानं आसमंत दुमदुमून गेला. दरम्यान, देशातील पहिलं शिव साहित्य संमेलन शाहू कलामंदिरात झालं. व्याख्याने, पोवाडे, छत्रपतींची युद्धनीती, दुर्गवैभव, अफजल खान वध, आदी कार्यक्रमही पार पडले.

हेही वाचा -

  1. पुण्यात अवतरली शिवशाही : शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून भव्यदिव्य मानवंदना, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
  2. छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रमानं आणि दूरदर्शी नेतृत्वानं स्वराज्याची पायाभरणी केली-पंतप्रधान मोदी
  3. छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2025 : अद्भुत स्थापत्य, अभेद्य राज्य; छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीपुढं शत्रू हतबल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.