हैदबाद : जर तुम्ही गुगल पे द्वारे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरून बिल भरत असाल तर तुम्हाला आता अतिरिक्त शुल्क भरावं लागणार आहे. कारण गुगल पे ने कार्ड पेमेंटवर ग्राहकांकडून सुविधा शुल्क घेण्याची तयारी केली आहे. परंतु, जर ग्राहकांनी UPI द्वारे पैसे भरले तर त्यांना कोणतंही अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही.
किती अतिरिक्त शुल्क भरावं लागेल?
हे शुल्क व्यवहाराच्या रकमेच्या 0.5% ते 1% असू शकतं. म्हणजेच, जर तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड द्वारे गुगल पे द्वारे 1,000 रुपये पेमेंट केले तर तुम्हाला 5 ते 10 रुपये पर्यंत सुविधा शुल्क भरावं लागू शकते. जेव्हा तुम्ही पेमेंट कराल, तेव्हा किती शुल्क आकारलं जातय हे तुम्हाला आगोदर कळेल. गुगल पे नं क्रेडिट आणि डेबिट कार्ड प्रोसेसिंगच्या खर्चाची भरपाई म्हणून हे सुविधा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व शुल्क फक्त टेलिव्हिजन रिचार्ज, पाणी बिल, गॅस बिल, वीज बिल आणि इतर सेवा यासारख्या युटिलिटी बिलांवर लागू असतील. क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर सुविधा शुल्क लागेल.
इतर ॲप्स आकारतात शुल्क
जरी Google Pay नं आता हे शुल्क आकारण्यास सुरुवात केली असली तरी, Amazon Pay, PhoneP,e आणि Paytm सारख्या इतर मोबाइल ॲप्स आधीच असं शुल्क आकारत आहेत. उदाहरणार्थ, Paytm च्या बाबतीत, या शुल्काला 'प्लॅटफॉर्म फी' म्हणतात. या शुल्काचा मोठा भाग प्लॅटफॉर्मच्या विकास आणि देखभालीवर खर्च केला जातो. Paytm नं त्यांच्या वेबसाइटवर म्हटलं आहे, की तंत्रज्ञान डेटा सुरक्षिततेपासून ते ग्राहक समर्थनापर्यंतचे सर्व ऑपरेशनल खर्च प्लॅटफॉर्म शुल्काचं कारण आहेत.
Paytm
Paytm नं त्यांच्या वेबसाइटवर म्हटलं आहे की, 'Paytm ने 2022 मध्ये इतर UPI अॅप्ससह रिचार्ज, बिल पेमेंटसारख्या विशिष्ट सेवांवर प्लॅटफॉर्म शुल्क आकारण्यास सुरुवात केली'
Amazon Pay
Amazon Pay वर, वीज, लँडलाइन/ब्रॉडबँड, पोस्टपेड, पाणी, महानगरपालिका सेवा, महानगरपालिका कर, केबल टीव्ही, शिक्षण शुल्क, पाईप गॅस आणि LPG वर सुविधा शुल्क लागू आहे. पेमेंट अॅप्लिकेशनमध्ये मास्टरकार्ड वापरून केलेल्या व्यवहारांवर सुविधा शुल्क आकारलं जातं, तर नॉन-आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या सर्व व्यवहारांवर 1.18% शुल्क आकारलं जातं. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डच्या बाबतीत, 10,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर 1.18 % शुल्क आकारलं जातं. जर एखाद्या ग्राहकानं अमेझॉन पे लेटर सुविधेचा वापर करून बिल भरलं तर ग्राहकांना 1.18 % शुल्क भरावं लागंत.
फोन पे
फोनपेच्या बाबतीत, ग्राहकांनी पाणी, पाईप गॅस आणि काही वीज सेवा प्रदात्यांसाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून बिल भरल्यास सुविधा शुल्क आकारलं जातं. फोनपेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, बेंगळुरूच्या बेसकॉम, एमपी वेस्ट रीजन-इंदूर, पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन आणि वेस्ट बंगाल स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे बिल भरण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना सुविधा शुल्क लागू होतं.
हे वाचंलत का :
Conclusion: