ETV Bharat / state

गडचिरोलीत आणखी एका गावानं केली नक्षलवाद्यांना गावबंदी; गावकऱ्यांनी 'इतक्या' भरमार बंदुका केल्या परत - BAN NAXALITE IN POYARKOTHI

गडचिरोलीतील अबुझमाड हा नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यातील पोयारकोठी गावात नक्षलवाद्यांना गावकऱ्यांनी गावबंदी केली. यावेळी गावकऱ्यांनी 2 भरमार बंदुका पोलिसांना परत केल्या आहेत.

Ban Naxalite In Poyarkothi
नक्षलवाद्यांना गावबंदी केल्याचं पत्र सादर करताना गावकरी (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2025, 10:44 AM IST

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्रातील अतिदुर्गम भागातील मौजा पेनगुंडासह एकुण 20 गावांनी नक्षलवाद्यांना एकमतानं गावबंदीचा ठराव संमत केला. यामुळे शासनाप्रती गडचिरोली इथल्या जनतेचा असलेला विश्वास अधोरेखीत झाला आहे. गुरुवारी भामरागडमधील पोयरकोठी इथल्या ग्रमास्थांनी नक्षलवाद्यांना गावबंदी करण्याचा ठराव केला. गावकऱ्यांनी पोलीस दलाच्या जवानांसोबत बैठक घेऊन याबाबतचा ठराव सादर केला. यावेळी 70 ते 80 नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी गावकऱ्यांनी 2 भरमार बंदुका पोलीस जवानांकडं सुपूर्द केल्या. त्यामुळे गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांना मोठा धक्का दिला आहे.

Ban Naxalite In Poyarkothi
नक्षलवाद्यांना गावबंदी केल्याचं पत्र सादर करताना गावकरी (Reporter)

गावकऱ्यांनी केला एकमतानं ठराव मंजूर : भामरागडमधील पोयरकोठी या गावातील नागरिकांनी एकमतानं नक्षलवाद्यांना गावबंदी करण्याचा ठराव मंजूर केला. यावेळी गावकऱ्यांनी कोठी पोलीस ठाण्यातील जवानांसोबत बैठक घेत आपला प्रस्ताव कोठी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडं सुपूर्द केला. नक्षलविरोधी लढाईत सगळे गावकरी पोलीस दलाच्या सोबत उभे आहेत, असं गावकऱ्यांनी जवानांना आश्वासन दिलं. त्यामुळे पोलीस दलातील जवानांचंही मनोधैर्य वाढलं आहे.

Ban Naxalite In Poyarkothi
गावकरी आणि पोलीस दलातील जवानांची बैठक (Reporter)

गावकऱ्यांनी दोन भरमार बंदुका केल्या पोलिसांकडं सुपूर्द : भामरागडमधील कोठी पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या पोयारकोठी या गावातील नागरिकांनी पोलीस दलाला साथ दिली. गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांना धक्का देत त्यांना गावबंदी केली. यावेळी गावकऱ्यांनी दोन भरमार बंदुका पोलीस दलाच्या जवानांकडं सुपूर्द केल्या.

नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात आहे पोयारकोठी गाव : पोयारकोठी हे गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर पहाडी इलाख्यात आहे. नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणा­या अबुझमाड परिसराच्या अगदी जवळ असल्यानं या गावात नक्षलवाद्यांचं वर्चस्व होतं. मात्र भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते आणि कोठी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शरद काकळीज यांनी सदर गावांमध्ये नागरिकांची मन वळवण्यात महत्वाची भूमिका बजावली. या गावबंदीमुळे नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसणार आहे. सदर गावबंदी ठराव करणाऱ्या गावातील नागरिकांचं विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांनी अभिनंदन केलं. अबुझमाड जंगल परिसरातील इतर गावातील नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता गडचिरोली जिल्ह्यास नक्षलवाद मुक्त जिल्हा करण्यात प्रशासनाची अशाच प्रकारची मदत करावी, असं आवाहन त्यांनी केलं.

हेही वाचा :

  1. नक्षलवाद्यांच्या गडात जवानांनी ठोकला तळ ; कोरागुट्टातील 25 वर्षापासून बंद रस्ता केला सुरू
  2. सात चकमकी, दोन जणांचा खून; छत्तीसगड, ओडिशात कारवाया करणाऱ्या जहाल नक्षलवादी महिलेचं आत्मसमर्पण - Naxal Woman Surrender In Gadchiroli
  3. 7 कुख्यात नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी ठोकल्या बेड्या; एकावर होतं 'इतकं' बक्षीस - Naxalite Arrested In Sukma

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.