ETV Bharat / sports

शारजाहचा बदला कराचीत पूर्ण... भारताच्या विक्रमाची बरोबरी करत आफ्रिकेचा सहज विजय - SA BEAT AFG 3RD MATCH

दक्षिण आफ्रिकेनं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या त्यांच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध 107 धावांनी मोठा विजय मिळवून विजयी सुरुवात केली.

SA Beat AFG 3rd Match
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Feb 22, 2025, 9:28 AM IST

कराची SA Beat AFG 3rd Match : न्यूझीलंड आणि भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघानंही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयानं सुरुवात केली आहे. कराची इथं खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा सहज पराभव केला आणि 107 धावांनी मोठा विजय मिळवला. रायन रिकेल्टनच्या संस्मरणीय पहिल्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं 315 धावांचा मोठा आकडा उभारला आणि त्यानंतर कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांच्यासह वेगवान गोलंदाजांनी अफगाणिस्तानला 208 धावांत गुंडाळलं.

आफ्रिकेचा सहज विजय : 21 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेतील गट ब चा हा पहिला सामना होता. तसंच, पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या अफगाणिस्तानचाही या स्पर्धेच्या इतिहासात पदार्पण सामना झाला. दोन्ही संघांच्या अलीकडील इतिहासाचा विचार करता, हा सामना खूप रोमांचक आणि कठीण होण्याची अपेक्षा होती. काही महिन्यांपूर्वीच शारहाज इथं अफगाणिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला वनडे मालिकेत हरवलं होतं. तसंच त्याआधी, T20 विश्वचषकातही दोघांमध्ये खूप चुरशीचा सामना झाला होता, जो दक्षिण आफ्रिकेनं जिंकला होता. पण यावेळी दोघांमधील संघर्ष एकतर्फी असल्याचं सिद्ध झालं. या सामन्यात विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेनं शारजाह इथं झालेल्या मालिका पराभवाचा बदला घेतला आहे.

रिकेलटनचं शानदार शतक : अफगाणिस्ताननं चांगली सुरुवात केली आणि दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर टोनी डी झोर्झीला लवकर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं. परंतु दुसरा सलामीवीर रियान रिकेलटननं कर्णधार बावुमा (58) सोबत डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी 127 धावांची भागीदारी केली, ज्यात प्रथम रिकेल्टन आणि नंतर बावुमा यांनी आपापलं अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर रिकेलटननं त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिलं शतकही पूर्ण केलं. तो 103 धावा करुन बाद झाला. पण दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी त्यांचे आक्रमण सुरुच ठेवले. रॅसी व्हॅन डर ड्यूसेन (52) यानं जलद अर्धशतक झळकावलं तर एडेन मार्करामनंही अवघ्या 36 चेंडूत नाबाद 52 धावा करत संघाला सन्मानजनक 315 धावांपर्यंत पोहोचवलं.

रहमतची खेळी वाया : फलंदाजांनंतर, दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांची पाळी होती, ज्यांनी पॉवर प्लेमध्येच अफगाणिस्तानला बॅकफूटवर आणलं. लुंगी एनगिडीनं डावाच्या चौथ्या षटकात रहमानुल्लाह गुरबाजला माघारी पाठवलं आणि रबाडानं दहाव्या षटकात इब्राहिम झद्रानला माघारी पाठवलं. पुढच्या 5 षटकांत, अफगाणिस्ताननं कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी आणि सेदिकुल्लाह अटल यांचे बळी गमावले, तर धावसंख्या फक्त 50 धावांपर्यंत पोहोचली. यानंतर, विकेट पडत राहिल्या पण रेहमत शाहनं दुसऱ्या टोकावरुन दक्षिण आफ्रिकेचा सामना एकट्यानंच सुरु ठेवला. त्यानं एकट्यानं 90 धावा केल्या पण संपूर्ण संघ 208 धावांवर ऑलआउट झाला. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडानं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

आफ्रिकेनं केली भारतच्या विक्रमाची बरोबरी : आफ्रिकन संघाच्या डावात रायन रिक्लटननं 103 धावा केल्या, तर कर्णधार बावुमानं 58, रीझा व्हॅन डर ड्यूसेननं 52 तर एडेन मार्करामनं 52 धावा केल्या. अशाप्रकारे, आफ्रिकन संघाच्या डावात 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारे चार फलंदाज होते. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात यापूर्वी, 2017 मध्ये बर्मिंगहॅमच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध खेळताना फक्त भारतीय संघालाच ही कामगिरी करता आली होती. पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात टीम इंडियाच्या चार खेळाडूंनी 50 किंवा त्याहून अधिक धावांच्या डाव खेळल्या. यात रोहित शर्मानं 91, शिखर धवननं 68, विराट कोहलीनं 81 तर युवराज सिंगनं 53 धावा केल्या. आता दक्षिण आफ्रिकेचा संघ हा पराक्रम करणारा दुसरा संघ बनला आहे.

हेही वाचा :

  1. 12 वर्षांनंतर कांगारु चॅम्पियन्स ट्रॉफीत पहिला विजय मिळवणार? AUS vs ENG मॅच 'इथं' पाहा लाईव्ह
  2. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीनं पहिल्याच चेंडूवर रचला इतिहास, चॅम्पियन्स ट्रॉफीत बनला खास विक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.