नवी मुंबई IND vs SL 1st IML Match Live : शनिवारी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या पहिल्या सामन्यात भारतीय क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग पुन्हा एकदा भारताची प्रतिष्ठित निळी जर्सी घालतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर 34,000 हून अधिक धावा आणि 100 शतकं करणारा दिग्गज खेळाडू तेंडुलकरनं खेळाच्या प्रत्येक स्वरुपात वर्चस्व गाजवलं. तथापि, त्यानं भारतासाठी फक्त एकच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. यामुळं चाहत्यांना खेळाच्या सर्वात लहान स्वरुपात त्याला पुन्हा एकदा भारतीय जर्सीमध्ये पाहणं मनोरंजक होईल.
Alexa play ▶️ 'Aaya sher, aaya sher' 🦁#IMLT20 #TheBaapsOfCricket #IndiaMasters pic.twitter.com/eqFdRasRM0
— INTERNATIONAL MASTERS LEAGUE (@imlt20official) February 21, 2025
काय म्हणाला तेंडुलकर : भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यांनी गेल्या काही वर्षांपासून चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. तेंडुलकर आणि युवराज यांनी असंख्य अविस्मरणीय सामने खेळले आहेत. त्यापैकी 2011 चा वनडे विश्वचषक अंतिम सामना आहे, ज्यात भारत विजेता ठरला. तेंडुलकर म्हणाला, 'गेल्या काही वर्षांत आपण श्रीलंकेविरुद्ध खेळताना काही अविस्मरणीय क्षण पाहिले आहेत, त्यापैकी 2011 चा विश्वचषक सर्वात खास होता. इतक्या वर्षांनी मैदानावर परतणं आणि आमच्या क्रिकेट प्रवासाचा इतका मोठा भाग असलेल्या संघाचा सामना करणं हे आणखी खास बनवतं.'
कुठं होणार सामने : या लीगमध्ये भारताव्यतिरिक्त श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या वेळापत्रकाबद्दल बोलायचं झालं तर, ही स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफीसोबत खेळवली जाईल. ही स्पर्धा 22 फेब्रुवारी रोजी सुरु होईल तर अंतिम सामना 16 मार्च रोजी खेळला जाईल. सर्व सामने नवी मुंबई, वडोदरा आणि रायपूर इथं खेळवले जातील.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगचा पहिला सामना कधी होईल?
भारत आणि श्रीलंका यांच्यात आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगचा पहिला सामना शनिवार, 22 फेब्रुवारी 2025 रोजी खेळला जाईल.
𝑷𝒓𝒆𝒑 𝑴𝒐𝒅𝒆: 🔛
— INTERNATIONAL MASTERS LEAGUE (@imlt20official) February 21, 2025
India Masters & Sri Lanka Masters are fine-tuning their game 🏏 as they are set for the big stage! 🏆 The 𝒃𝒂𝒕𝒕𝒍𝒆 𝒃𝒆𝒈𝒊𝒏𝒔 𝒕𝒐𝒎𝒐𝒓𝒓𝒐𝒘 ⚔️#TheBaapsOfCricket #IMLonJioHotstar #IMLonCineplex #IndiaMasters #SriLankaMasters pic.twitter.com/7PzRzSUJC4
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगचा पहिला सामना कुठं खेळला जाईल?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगचा पहिला सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगचा पहिला सामना किती वाजता सुरु होईल?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगचा पहिला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल. ज्यासाठी टॉस संध्याकाळी 7 वाजता होईल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगचा पहिला सामना टीव्हीवर कसा पहावा?
भारत आणि श्रीलंका यांच्यात आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगचा पहिला सामना Colors Cineplex (SD & HD) आणि Colors Cineplex सुपरहिट्सवर वाहिन्यांवर पाहता येईल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगचा पहिला सामना फ्रीमध्ये कुठं पाहता येईल?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगचा पहिला सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार वेबसाइट आणि मोबाईल अॅप्लिकेशनवर केलं जाईल. चाहते फ्रीमध्ये मोबाईलवर हा सामना लाईव्ह पाहू शकतात.
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी-20 साठी भारतीय संघ : सचिन तेंडुलकर (कर्णधार), युवराज सिंग, सुरेश रैना, अंबाती रायुडू, युसूफ पठाण, इरफान पठाण, स्टुअर्ट बिन्नी, धवल कुलकर्णी, विनय कुमार, शाहबाज नदीम, राहुल शर्मा, प्रज्ञान ओझा, पवन नेगी, गुरकीरत मान, मिथुन मन्हास.
हेही वाचा :