मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'छावा' हा चित्रपट 2025 मधील सर्वात मोठा कमाई करणार चित्रपट ठरला. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटानं पहिल्याच आठवड्यात 100 कोटीचा टप्पा ओलांडला. 'छावा' चित्रपटानं अवघ्या 6 दिवसात 200 कोटींची कमाई केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. आता या चित्रपटाला रिलीज होऊन 7 दिवस पूर्ण झाले आहेत. उत्तम सुरुवातीनंतर, पहिल्या सोमवारपासून या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट झाली आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, पहिल्या सोमवारी 'छावा'च्या कमाईत 50 टक्क्यांहून अधिक घसरली झाली आहे.
'छावा'ची एकूण कमाई : या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 33.10 कोटीची कमाई केली होती. तसेच सहाव्या दिवशी 'छावा'ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा लाभ मिळाला. 'छावा'नं सहाव्या दिवशी 32.40 कोटीची कमाई केली. याशिवाय सॅकनिल्कच्या मते रिलीजच्या सातव्या दिवशी या चित्रपटानं 22 कोटीची कमाई केली आहे. 'छावा' चित्रपटाचं एकूण कलेक्शन 225.68 कोटी झालं आहे. आता हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 300 कोटीचा टप्पा गाठण्याची वाटचाल करत आहे. या चित्रपटामधील विकी कौशलचा अभिनय अनेकांना आवडला, त्यामुळे अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यामातून विकीचं कौतुक करत आहेत. या चित्रपटामध्ये विकीनं छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकरली आहे.
An epic cinematic triumph! Chhaava roars past 200 Cr, echoing the spirit of warriors and legends! 🔥
— Pen Movies (@PenMovies) February 20, 2025
Book your tickets now
🔗 - https://t.co/25arihiSHR#ChhaavaInCinemas Now.#ChhaavaOutNow #ChhaavaRoars pic.twitter.com/jMAdkRvelS
'छावा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
पहिला दिवस 33.10 कोटी रुपये
दुसरा दिवस 39.30 कोटी रुपये
तिसरा दिवस 49.03 कोटी रुपये
चौथा दिवस 24.10 कोटी रुपये
पाचवा दिवस 25.75 कोटी
सहावा दिवस 32.40 कोटी
सातवा दिवस 22 कोटी
एकूण 225.68 कोटी
'छावा' चित्रपटाबद्दल : सध्या सोशल मीडियावर अनेकजण 'छावा' चित्रपट पाहताना व्हिडिओ शेअर करत आहेत, यामध्ये शिवभक्त थिएटरमध्ये संभाजी महाराजांसाठी जयजयकार करताना दिसत आहेत. 'छावा'ला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. या चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त आशुतोष राणा, दिव्या दत्ता अक्षय खन्ना, प्रदीप रावत, डायना पेंटी, आलोक नाथ आणि इतर स्टार्सनं काम केलं आहे.
हेही वाचा :