ETV Bharat / state

दरोड्यापूर्वीच सशस्त्र टोळी गजाआड, हत्येची सुपारी देणाऱ्या उदयनराजे समर्थकाच्या मुलाला अटक - SATARA CRIME NEWS

सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना सातारा पोलिसांनी बुधवारी पहाटे अटक केली. त्यांच्याकडून एकाच्या हत्येचा कट उघडकीस आला. या प्रकरणात उदयनराजे समर्थकाच्या मुलाला अटक झाली.

satara crime
दरोड्यापूर्वीच सशस्त्र टोळी गजाआड (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2025, 10:47 AM IST

सातारा - सराफा दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि सातारा शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली आहे. या टोळीला एकाच्या हत्येसाठी २० लाख रूपयांची सुपारी देणाऱ्या माजी नगरसेवकाच्या मुलासह मध्यस्थालाही अटक करण्यात आली.

पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितलं की, अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी काहीजण जमले होते. दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती डायल ११२ वरून पोलिसांना मिळाली. बीट मार्शल घटनास्थळी तात्काळ पोहोचले. संबंधितांकडे शस्त्रे पाहून बीट मार्शलांनी फौजफाटा मागवला. एलसीबी आणि शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी, कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयितांना शिताफीने पकडले. त्यावेळी एकजण पळून गेला.

two pistols five cartridges seizes
जप्त केले शस्त्र (Source - ETV Bharat)

दोन पिस्तुलांसह पाच काडतुसे जप्त- अनुज चिंतामणी पाटील, दीप भास्कर मालुसरे, क्षितीज विजय खंडाईत (तिघेही रा. गुरुवार पेठ, सातारा, आनंद शेखर जाधव उर्फ जर्मनी (रा. हनुमाननगर, इचलकरंजी, कोल्हापूर), अक्षय अशोक कुंडूगळे (रा. जवाहरनगर, इचलकरंजी, कोल्हापूर) क्षितीज विजय खंडाईत, या पाच जणांना ताब्यात घेतलं. अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे दोन देशी बनावटीची पिस्तुले, ५ जिवंत काडतुसे, ४ रिकाम्या पुंगळ्या, २ लोखंडी सुरे सापडले. साताऱ्यातील सराफी दुकानावर दरोडा टाकणार होतो, अशी कबुली संशयितांनी दिली.

माजी नगरसेवकाच्या मुलासह मध्यस्थाला अटक- विधानसभेच्या मतदानादिवशी नीलेश वसंत लेवे आणि पप्पू लेवे यांच्यात झालेल्या भांडणात नीलेशचे वडील, उदनयराजे समर्थ वसंत लेवे यांना धीरज ढाणेसह त्याच्या मित्रांनी मारहाण केली होती. त्या रागातून नीलेश लेवेने धीरज ढाणेचा गेम करण्यासाठी २० लाखांची सुपारी आणि त्यापोटी २ लाख रुपये ॲडव्हान्स दिला असल्याची धक्कादायक कबुली संशयित अनुज पाटीलनं दिली. त्यावरून पोलिसांनी नीलेश लेवे (रा. चिमणपुरा, सातारा) आणि सुपारी देण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या विशाल राजेंद्र सावंत (रा. टिटवेवाडी, ता. सातारा) यांना दोघांनाही अटक केली.

  • पोलीस पथकाला ४५ हजार रूपयांचं रोख बक्षीस- कारवाई करणाऱ्या पोलीस पथकाला ४५ हजार रूपयांचं रोख बक्षीस आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केलं. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सात जणांना बुधवारी दुपारी सातारा न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचं पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितलं.

हेही वाचा-

  1. मायानगरीत 10 कोटींचे अमली पदार्थ जप्त, गुन्हे शाखेकडून दोघांना अटक
  2. नाशिकमध्ये गुन्हेगारीत वाढ; शस्त्राचा धाक दाखवत पेट्रोल पंप आणि ज्वेलर्समध्ये चोरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.