ETV Bharat / entertainment

'छावा'नं रचला इतिहास : 2025 आणि विकी कौशलच्या कारकिर्दीचा सर्वात मोठा ओपनर बनला 'छावा' - CHHAWA BOX COLLECTION

'छावा' नं पहिल्या दिवशी अनेक विक्रम रचले आहेत. विकी कौशलचा, 2025 चा आणि आजवरच्या व्हॅलेंटाईन डेचा सर्वात मोठा ओपनर म्हणून छावाची नोंद झाली आहे.

'Chhaava' creates history
'छावा'नं रचला इतिहास ('Chhaava' trailer screen grab)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 15, 2025, 12:55 PM IST

मुंबई - या वर्षीचा व्हॅलेंटाईन डे चित्रपट प्रेमींसाठी पर्वणी ठरला आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या भूमिका असलेला ऐतिहासिक कालखंडातील नाट्यमय 'छावा' हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी त्यानं लोकांची मनं जिंकली. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. २०२५ मधील सर्वात मोठं ओपनिंग देणारा चित्रपट म्हणून याची नोंद झाली आहे. इतकंच नाही तर हा व्हॅलेंटाईन डे दिवशी आजवर रिलीज झालेला सर्वात मोठा ओपनर चित्रपटही ठरला आहे.

विकी कौशलच्या या नवीन चित्रपटानं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी त्याने ३० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. सॅकॅनिल्कमधील एका वृत्तानुसार, 'छावा'ने पहिल्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 33.10 कोटी रुपये कमावले आहेत.

'छावा'चा विक्रम - विकी कौशलचा हा चित्रपट २०२५ मधील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट बनला आहे, त्याने या वर्षी प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' चित्रपटालाही मागं टाकलं आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित झालेल्या 'स्काय फोर्स'नं पहिल्या दिवशी १५.३० कोटी रुपयांची कमाई केली होती. 'छावा'नं अक्षय कुमार-वीर पहाडिया यांच्या चित्रपटापेक्षा दुप्पट कमाई केली आहे.

यासोबतच 'छावा' हा विकी कौशलचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर चित्रपट बनला आहे. या चित्रपटाने कौशलच्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' या हिट चित्रपटालाही मागे टाकले आहे, ज्याने पहिल्या दिवशी ८.२० कोटी रुपये कमावलं होतं.' छावा'ची पहिल्या दिवशीची कमाई 33.10 कोटी इतकी झालीय. विकी कौशलच्या आजवर रिलीज झालेल्या सर्व चित्रपटाहून ही कमाई जास्त आहे. त्याच्या आजपर्यंत रिलीज झालेल्या चित्रपटांच्या पहिल्या दिवशीच्या कमाईवर एक नजर टाका.

  • छावा - 33.10 कोटी
  • बॅड न्यू- - 8.62 कोटी
  • उरी - 8.20 कोटी
  • राझी - 7.53 कोटी
  • सॅम बहाद्दुर - 6.25 कोटी
  • जरा हटके जरा बचके - 5.49 कोटी
  • भूत - 5.10 कोटी
  • मनमर्जिंयाँ - 3.52 कोटी

तळटीप #संजू आणि # डंकी या चित्रपटांचा समावेश या यादीत करण्यात आलेला नाही.

व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रदर्शित झालेले सर्वात मोठे चित्रपट - याशिवाय 'छावा'नं व्हॅलेंटाईन डे रिलीज झालेल्या सर्वात मोठ्या ओपनर चित्रपटाचा विक्रमही आपल्या नावावर केलाय. विकी-रश्मिकाच्या या चित्रपटानं रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या 'गली बॉय' चित्रपटालाही मागं टाकले आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित झालेल्या 'गली बॉय'नं पहिल्या दिवशी १९.४० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आणि व्हॅलेंटाईन डेच्या सर्वात मोठ्या रिलीजमधील टॉप ओपनर चित्रपट ठरला. तेव्हापासून, कोणताही चित्रपट 'गली बॉय'ला मागं टाकू शकलेला नाही. पण या वर्षी 'छावा' ने विक्रम मोडला आणि व्हॅलेंटाईन डे ला प्रदर्शित होणाऱ्या सर्वात मोठ्या चित्रपटाचा किताब पटकावला.

'छावा'चा बॉक्स ऑफिसवर संघर्ष - भारतीय बॉक्स ऑफिसवर, 'छावा' हा चित्रपट 'कॅप्टन अमेरिका: ब्रेव्ह न्यू वर्ल्ड', 'लव्हयापा', 'बॅडस रवी कुमार' आणि 'सनम तेरी कसम' यासारख्या हॉलिवूड चित्रपटांच्या रिलीजशी स्पर्धा करत आहे.

'छावा' बद्दल - 'छावा' हा एक ऐतिहासिक काळातील नाट्यमय चित्रपट आहे. हे भारतातील महान योद्ध्यांपैकी एक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र, मराठा राजा संभाजी यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट त्याच नावाच्या एका मराठी कादंबरीवर आधारित आहे. ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिली होती.

'छावा' मध्ये विकी कौशलसोबत महाराणी येसूबाईच्या भूमिकेत रश्मिका मंदाना, सर-जनरल हंबीराव मोहितेच्या भूमिकेत आशुतोष राणा, औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्ना आणि सोयराबाईच्या भूमिकेत दिव्या दत्ता आहेत.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.