मुंबई - Bade Miyan Chote Miyan :अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा दमदार ट्रेलर 26 मार्चला रिलीज झाला. हा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडल्याचं दिसतं. ट्रेलर पाहून चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटातून अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटामध्ये दोन्ही ॲक्शन स्टार्स जबरदस्त स्टंट करताना दिसणार आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. दरम्यान, याआधी 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटामधील खलनायकाची भूमिका साकारणारा साऊथ अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनचा धमाकेदार अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
'बडे मियाँ छोटे मियाँ'मधील खलनायकाचा लूक :'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटामधील सुकुमारनचा लूक 30 मार्च रोजी रिलीज करण्यात आला आहे. त्याचा चेहरा अद्याप दाखवलेला नाही. सुकुमारनच्या चेहऱ्यावर मास्क असल्यानं त्याचा चेहरा पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. निर्मात्यांनी खलनायकाचा लूक शेअर करत लिहिलं, "आमच्या ॲक्शन हिरोचा अँटी-हिरो येथे आहे.'' या पोस्टरमध्ये सुकुमारन हा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये असून त्याच्या चेहऱ्यावर मास्क असल्याचं दिसत आहे. या चित्रपटामध्ये मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा, जान्हवी कपूर, आलिया इब्राहिम, जुगल हंसराज आणि इतर कलाकार दिसणार आहेत.