मुंबई - Kiran Rao : हिंदी चित्रपटसृष्टीतील 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान चाहत्यांसाठी खूप खास आहे. आमिर उद्या त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करणार आहे. याआधी आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावनं एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. किरणनं तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आमिर खान त्याच्या पहिल्या पत्नीपासून दूर तिच्यामुळे झाला नसल्याचं सांगितलं. किरणने सांगितले की, ''जेव्हा आमिर खानचा घटस्फोट झाला, तेव्हा मी त्याच्याबरोबर बोललेही नव्हते. बरेच लोक म्हणतात की माझे आमिरबरोबर कनेक्शन 'लगान'च्या सेटवर झाले होते, मात्र तसे काही नाही.''असं पुढं तिनं म्हटलं, ते दोघेही 'स्वेदश' चित्रपटादरम्यान एकत्र आले होते.
किरणनं केला खुलासा :किरणनं पुढं म्हटलं की, 'मंगल पांडे' (2005) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काही जाहिरातींचे चित्रीकरण झाले होते आणि यादरम्यान ती आमिर खानशी जोडली गेली. 'लगान' चित्रपटानंतर हे सर्व घडल्याचेही किरणनं सांगितलं आहे. किरण पुढं म्हटलं की, ''लगान' आणि 'मंगल पांडे' चित्रपटादरम्यान मी आमिरला भेटले होते. यावेळी मी दुसऱ्या व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये होते.'' आमिर खाननं आत्तापर्यंत दोनदा लग्न केलं आहे. आता तो आपल्या दोन्ही पत्नींपासून (रीना दत्ता आणि किरण राव) विभक्त होऊन घटस्फोटित जीवन जगत आहे. घटस्फोटानंतरही आमिर खान आपल्या दोन्ही पत्नींना भेटत असतो.