महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कृष्णा अभिषेकशी असलेल्या वादानंतरही गोविंदानं आरती सिंगच्या लग्नाला लावली हजेरी - Krushna Abhishek - KRUSHNA ABHISHEK

Arti Singh Wedding : गोविंदाने त्याचा भाचा कृष्णा अभिषेकशी असलेले मतभेद बाजूला ठेवल्याचं दिसून आलं. मुंबईत त्याच्या बहिणीच्या लग्नाला गोविंदा उपस्थित होता. अभिषेकची बहिण आरतीच्या लग्नात गोविंदाची उपस्थिती हे दोघांच्यामध्ये समेट झाल्याचं मानलं जातंय. गेल्या 8 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांच्यात मतभेद होते.

Govinda Graces Arti Singh Wedding
कृष्णा अभिषेक

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 26, 2024, 2:51 PM IST

मुंबई- Arti Singh Wedding : अभिनेता गोविंदानं भूतकाळातील मतभेद बाजूला ठेवून त्याचा भाचा कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंगच्या लग्नाला हजेरी लावली. मामा गोविंदा आणि भाचा अभिषेक यांच्यातील नातं गेल्या 8 वर्षापसून तणावाचं राहिलं आहे. त्यामुळे गोविंदा अभिषेकच्या बहिणीच्या लग्नाला हजर राहणार का याबाबतीत शंका बाळगली जात होती. आरती सिंगचा विवाह मुंबईतील व्यापारी दिपक चौहान याच्याशी झाला. मुंबईतील इस्कॉन मंदिरात पारपडलेल्या या लग्नाला अभिषेकचे मित्र, नातेवाईक आणि फिल्म इंडस्ट्रीतील अनेक लोक उपस्थित होते.

गोविंदा आणि कृष्णा यांच्यातील प्रदीर्घ काळाचा कलह लक्षात घेता लग्नात गोविंदाला पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. गोविंदानं कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्यापूर्वी पापाराझींचं स्वागत केलं. या लग्नाच्या कार्यक्रमाबद्दल बोलताना त्यानं आरती सिंगला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अभिषेक कृष्णा आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह यांनी गोविंदाच्या उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त केला. कश्मिराने शेअर केले, "मला खूप आनंद झाला आहे की त्यानं लग्नाला हजेरी लावली आणि आमच्या दोन्ही मुलांना आशीर्वाद दिला." कृष्णा पुढे म्हणाला की, "त्याला पाहून मला खूप आनंद झाला. आमचा त्याच्याशी भावनिक संबंध आहे."

कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यामध्ये 2016 मध्ये ताणाव निर्माण झाला. गोविंदानं कृष्णाच्या कॉमेडी नाईट्स लाइव्ह या शोमध्ये हजर राहण्याऐवजी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्यानंतर दोघांमध्ये बिनसले होते. कृष्णाने त्याच्या शोमध्ये गोविंदाचा मामा असा उल्लेख केल्यानं मतभेद अधिकच गडद झाले. स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करूनही तणाव कायम होता.

2018 मध्ये कृष्णा अभिषेकच्या 'द ड्रामा कंपनी'च्या शोमध्ये हजेरी लावल्यानंतर गोविंदाची पत्नी सुनीता हिने कृष्णाची पत्नी, कश्मीरा हिने सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल अपमानास्पद कमेंट पोस्ट केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हे मतभेद आणखी वाढतच गेले. या घटनेमुळे कुटुंबीय दुखावले गेले, असे सांगत सुनीताने आपली निराशा व्यक्त केली होती.

हेही वाचा -

  1. फरदीन खानला 24 वर्षापूर्वी भन्साळी यांनी दिला होता नकार, त्यानंच सांगितला हा भन्नाट किस्सा - Fardeen Khan
  2. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन 14 वर्षांनंतर फॅन्टसी हॉरर चित्रपटासाठी एकत्र - Akshay Kumar
  3. एकेकाळी रिॲलिटी शोमधून झाला होता बाहेर, आज पार्श्वगायनाचा 'बादशाहा' - Arijit Singh

ABOUT THE AUTHOR

...view details