रांची Plane crash in Jamshedpur : जमशेदपूर येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे हवाई दलाचं प्रशिक्षणार्थी विमान कोसळलय. या अपघातात दोन पायलट बेपत्ता असल्याची माहिती समोर आलीय. हा अपघात इतका भीषण होता की, विमानाचं पूर्णपणे नुकसान झालं आहे. सध्या दोन्ही पायलटच्या शोधासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे. अपघातग्रस्त विमानाने सोनार विमानतळावरून सकाळी 11 वाजता उड्डाण केलं होतं.
झारखंडच्या जमशेदपूरमध्ये प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, दोन पायलट बेपत्ता - Plane crash in Jamshedpur - PLANE CRASH IN JAMSHEDPUR
Plane crash in Jamshedpur - झारखंडमधील जमशेदपूरमध्ये विमान अपघात झाला आहे. अपघातानंतर विमानाचे दोन्ही पायलट बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
प्रशिक्षणार्थी विमान कोसळले (Source- Etv Bharat)
Published : Aug 20, 2024, 7:17 PM IST
|Updated : Aug 20, 2024, 11:03 PM IST
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 3 च्या सुमारास पाटामडा येथील स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली की, आमडा डोंगराजवळ एक विमान कोसळलं आहे. याआधी 11 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील हवाई पट्टीजवळ एका खासगी एव्हिएशन ॲकॅडमीचे प्रशिक्षण विमान कोसळल्याने दोन पायलट जखमी झाले.
Last Updated : Aug 20, 2024, 11:03 PM IST