ETV Bharat / entertainment

क्रिती सेनॉन रूमर्ड बॉयफ्रेंड कबीर बाहियाबरोबर करणार लग्न ? नवी दिल्ली विमानतळावर एकत्र झाले स्पॉट.. - KRITI SANON AND KABIR BAHIA

क्रिती सेनॉन आणि तिचा रूमर्ड बॉयफ्रेंड कबीर बाहिया लग्न करणार असल्याच्या चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे. हे दोघेही नवी दिल्ली विमानतळावर एकत्र दिसले.

Kriti Sanon
क्रिती सेनॉन (Kriti Sanon Is All Smiles As She Holds Rumoured Boyfriend Kabir Bahia's Hand In Christmas Pic (Photo: IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 16, 2025, 1:39 PM IST

मुंबई: अभिनेत्री क्रिती सेनॉन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. बऱ्याच काळापासून तिच्या बिझनेसमॅन कबीर बहियासोबतच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आहेत. मात्र या दोघांनीही कधीही त्यांच्या नात्याची पुष्टी केली नाही. अनेकदा हे दोघेही एकत्र दिसले आहेत. कौटुंबिक कार्यक्रमापासून ते पार्ट्यांपर्यंत, दोघेही एकत्र एन्जॉय करताना दिसतात. आता दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहे. एका न्यूज पोर्टलनुसार दोघेही त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. क्रिती आणि कबीर हे अलीकडेच एकत्र विमानतळावर स्पॉट झाले होते. विमातळावर क्रितीनं मास्क घातलं होता. तसेच तिनं काळ्या रंगाचा चष्मा आणि टोपी घातली होती. डेनिम जीन्स आणि काळ्या जॅकेटमध्ये क्रिती खूप सुंदर दिसत होती.

क्रिती सेनॉन करणार लग्न ? : तसेच कबीर बहियानं देखील काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. आता हे दोघेही 2025च्या अखेरीस लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अलीकडेच क्रिती आणि कबीर बेंगळुरूमध्ये एका लग्नात एकत्र दिसले होते. दोघांचाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता. या व्हिडिओमध्ये दोघेही लग्नाचा आनंद घेताना दिसत होते. कबीर हा लंडनमधील एक व्यावसायिक असल्याचं सांगण्यात येत आहे. आता क्रिती सेनॉन आपल्या चाहत्यांना लवकरच आनंदाची बातमी देऊ शकते, असं सध्या दिसत आहे.

क्रिती सेनॉनचं वर्कफ्रंट : दरम्यान क्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'दो पत्ती' या चित्रपटात काजोल आणि शाहीर शेखबरोबर दिसली होती. तिचा हा चित्रपट अनेकांना आवडला होता. या चित्रपटात ती दुहेरी भूमिकेत दिसली होती. क्रितीचा हा निर्माता म्हणून पहिलाच चित्रपट होता. आता ती आनंद एल राय यांच्या 'तेरे इश्क में' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर साऊथ अभिनेता धनुष असणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. तिच्या चाहत्यांना हा टीझर खूप पसंत पडला होता. क्रितीचा हा आगामी चित्रपट नोव्हेंबर 2025मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. धनुष स्टारर 'तेरे इश्क में'ची टीझरसह रिलीज डेट जाहीर, 'या' बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर करणार रोमान्स...
  2. 'दो पत्ती'च्या सक्सेस पार्टीत क्रिती सेनॉनचा जलवा, व्हिडिओ व्हायरल
  3. 'दो पत्ती'चा ट्रेलर रिलीज, दोन बहिणींच्या 'महाभारत'मध्ये अडकली काजोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.