नवी दिल्ली - राजधानीत रेल्वे स्थानकावर शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीवरून (New Delhi stampede) काँग्रेसनं केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकारनं पारदर्शकता दाखवून आणि जबाबदारी निश्चित करावी, अशी काँग्रेसनं मागणी केली.
नवी दिल्लीतील रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू (NDLS stampede) झाला. सुमारे १,५०० जनरल डब्याची तिकिटे विकली होती. अचानक गर्दी उसळल्यानं रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्याचा दावा करण्यात येत आहे. या दुर्घटनेचे संपूर्ण देशात राजकीय पडसाद उमटले आहेत.
नई दिल्ली रेलवे स्टेशन पर भगदड़ मचने से कई लोगों की मृत्यु और कईयों के घायल होने की ख़बर अत्यंत दुखद और व्यथित करने वाली है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 16, 2025
शोकाकुल परिवारों के प्रति अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूं और घायलों के शीघ्र स्वस्थ होने की आशा करता हूं।
यह घटना एक बार फिर रेलवे की नाकामी और सरकार…
काँग्रेसची सरकारवर टीका- दिल्लीत रेल्वे स्थानकावरील मृत आणि जखमींची संख्या लवकरात लवकर जाहीर करावी. बेपत्ता लोकांची ओळखदेखील जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून केली. जखमींना त्वरित वैद्यकीय मदत द्यावी. तसेच पीडिताच्या कुटुंबियांना आधार देण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. पीडितांच्या कुटुंबियांबद्दल आम्ही दु:ख व्यक्त करत आहोत. जखमींना त्वरित वैद्यकीय उपचार देण्यात यावेत, अशी काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जून खर्गे यांनी अपेक्षा व्यक्त केली. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशीही त्यांनी मागणी केली. स्टेशनवरून दुर्घटनेचे येणारे व्हिडिओ अत्यंत हृदयद्रावक आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील मृत्यूंच्या बाबतीत सत्य लपवण्याचा नरेंद्र मोदी सरकारनं केलेला प्रयत्न अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्षांनी केली. प्रचंड गर्दी हाताळण्यासाठी चांगल्या व्यवस्था करण्याची गरज आहे. ही दुर्दैवी घटना रोखता आली असती, असे मत काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी व्यक्त केलं.
नई दिल्ली रेलवे स्टेशन पर भगदड़ से कई लोगों की मृत्यु हो जाने का समाचार अत्यंत पीड़ादायक है। स्टेशन से आ रहे वीडियो बेहद हृदयविदारक है।
— Mallikarjun Kharge (@kharge) February 15, 2025
नई दिल्ली रेलवे स्टेशन पर हुई मौतों के मामले में नरेंद्र मोदी सरकार द्वारा सच्चाई छिपाने की कोशिश बेहद शर्मनाक व निंदनीय है।
हमारी मांग है…
राहुल गांधींची सरकारवर टीका- लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता समोर आल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन रेल्वे स्थानकावर चांगली व्यवस्था करायला हवी होती. गैरव्यवस्थापन आणि निष्काळजीपणामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागू नये, याची सरकार आणि प्रशासनानं काळजी घ्यावी, अशी अपेक्षा लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांनी केली.
उद्योगपती आणि पंतप्रधान मोदी कुंभमेळाव्याला गेले होते. महाकुंभ मेळाव्याचं मार्केटिंग करून राजकीय व्यापार केला आहे. गेल्या चार दिवसांपासून दिल्लीतील रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली होती. रेल्वेची खिडकी फोडून जात असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. सरकारला थोडीशीदेखील माणुसकी नाही. आमच्या सूत्राच्या माहितीनुसार रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेत १०० हून जास्त मृतांचा आकडा आहे-शिवसेना खासदार(यूबीटी)-संजय राऊत
- शिवसेनेचे खासदार (यूबीटी) संजय राऊत यांनीदेखील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवरून मोदी सरकारसह योगी सरकारवर टीका केली. त्यांनी महाकुंभ मेळाव्यातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ हजारांहून अधिक असल्याचा दावा करत महाकुंभ मेळाव्याच्या नियोजनावरून सरकारवर टीका केली.
- दरम्यान, रेल्वेनं मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना २.५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपये मदत देण्याचं जाहीर केले.
हेही वाचा-