मुंबई IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा 18 वा हंगाम 22 मार्चपासून सुरु होण्याची शक्यता आहे, ज्यासाठी सर्व 10 संघांनी आधीच तयारी सुरु केली आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्स संघानं आगामी हंगामासाठी त्यांच्या संघात बदल जाहीर केले आहेत. खरंतर, मुंबई इंडियन्स संघाचा एक भाग असलेला अल्लाह गझनफर दुखापतीमुळं आगामी आयपीएल हंगामाबाहेर आहे, ज्यात त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान 4 आठवडे लागतील, अशा परिस्थितीत आता मुंबई इंडियन्सनं त्याच्या जागी बदली खेळाडूचं नाव जाहीर केलं आहे.
'📰 𝗠𝘂𝗺𝗯𝗮𝗶 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻𝘀 𝘀𝗶𝗴𝗻 𝗠𝘂𝗷𝗲𝗲𝗯 𝗨𝗿 𝗥𝗮𝗵𝗺𝗮𝗻 🇦🇫
— Mumbai Indians (@mipaltan) February 16, 2025
Mujeeb Ur Rahman, the Afghan off spinner has been signed by Mumbai Indians as a replacement for Allah Ghazanfar who has been ruled out of IPL 2025 due to an injury.
Mujeeb was one of the youngest ever… pic.twitter.com/urNJhbfVl7
मुजीब उर रहमानचा संघात समावेश : आयपीएल 2025 च्या मेगा प्लेअर लिलावात, कोणत्याही संघानं अफगाणिस्तान संघाचान 23 वर्षीय फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमानला संघात घेण्यास रस दाखवला नाही. आता, अल्लाह गझनफरच्या बाहेर पडल्यानंतर, मुंबई इंडियन्सनं त्याला त्यांच्या संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुजीब अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर केलेल्या अफगाणिस्तान संघाचाही तो भाग नाही. मात्र आयपीएलच्या 18 व्या हंगामाच्या सुरुवातीपूर्वी मुजीब पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत तो संपूर्ण हंगामासाठी मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी उपलब्ध असेल.
🚨 MUJEEB TO MUMBAI...!!!! 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) February 16, 2025
- Mujeeb replaces Allah Ghazanfar in Mumbai Indians in IPL 2025. pic.twitter.com/SYBVJiGIyP
मुजीब उर रहमान आतापर्यंत आयपीएलमध्ये 2 संघांकडून खेळला : मुजीब उर रहमानबद्दल बोलायचं झालं तर, तो आतापर्यंत आयपीएलमध्ये 2 संघांसाठी खेळला आहे, ज्यात त्यानं पंजाब किंग्ज संघाकडून खेळून आयपीएलमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर तो सनरायझर्स हैदराबाद संघाचाही भाग बनला. मुजीबनं शेवटचा आयपीएल सामना 2021 मध्ये खेळला होता. आतापर्यंत मुजीबला आयपीएलमध्ये 19 सामने खेळण्याची संधी मिळाली आहे, ज्यात त्यानं 31.16 च्या सरासरीनं 19 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी 27 धावांत 3 विकेट्स होती.
🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨
— IndianPremierLeague (@IPL) February 16, 2025
Mujeeb-ur-Rahman replaces Allah Ghazanfar in Mumbai Indians.
Details 🔽 #TATAIPL | @mipaltanhttps://t.co/GFwvoaUxhR
हेही वाचा :