मुंबई - 'बिग बॉस 18'चा विजेता करणवीर मेहरा त्याच्या लव्ह लाईफ'मुळे खूप चर्चेत आहे. अलीकडेच त्यानं अभिनेत्री चुम दरंगला त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. व्हॅलेंटाईन डेला करणनं किस घेऊन आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. सध्या दोघांचेही अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चुमनं तिच्या इंस्टाग्रामवर व्हॅलेंटाईन डेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये करणवीर चुमसमोर आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये करणनं म्हटलं, "गुलाब लाल आहेत, व्हायलेट निळे आहेत, मला त्यापैकी कोणाचीही पर्वा नाही, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो."
करणवीर मेहरानं चुम दरंगला केलं प्रपोज : यानंतर ही गोष्ट ऐकल्यानंतर चुम दरंग लाजली. आता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हे दोघेही जोडपे आहेत, या दोघांनीही त्यांच्या नात्याची पुष्टी केली आहे. करणवीर आणि चुमची जोडी अनेकांना खूप आवडते. या दोघांची पहिली भेट 'बिग बॉस 18'च्या घरात झाली होती. या शोमध्ये दोघांची मैत्री झाली. या शोदरम्यान करणवीर हा चुमच्या प्रेमात पडला. शोदरम्यान त्यानं अनेक वेळा चुमसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र त्यावेळी चुम त्याला तिचा चांगला मित्र मानत होती. आता व्हिडिओ समोर आल्यानंतर असं वाटत आहे की, दोघेही लवकरच लग्न करू शकतात.
करणवीर मेहरा आणि चुम दरंग यांच्याबद्दल : तसेच चुमबद्दल बोलायचं झालं तर ती अनेकदा आपले सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. यापूर्वी ती शिल्पा शिरोडकर आणि चित्रपट निर्मात्या फराह खानबरोबर देखील दिसली होती. या तिघींनी शिल्पाच्या घरी पार्टी केली होती. या पार्टीमधील काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते. दुसरीकडे करणवीर देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो देखील आपल्या चाहत्यांबरोबर सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. करणवीरनं 'बिग बॉस 18' जिंकण्यापूर्वी 'खतरों के खिलाडी 14' हा शो जिंकला आहे. या शोचा होस्ट हा रोहित शेट्टी होता.
हेही वाचा :