मुंबई- मुंबईतील मशीद बंदर परिसरातील टोलेजंग अशा ११ मजली ( Mumbai fire news) इमारतीला आग लागली. या आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
दक्षिण मुंबईतील मस्जिद बंदर परिसरात असलेल्या पन्ना अली मॅन्शन इमारतीच्या तळमजल्यावरील कॉमन पॅसेजमधील इलेक्ट्रिक वायरिंगला आग लागली. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील कॉमन पॅसेजमधील दोन महिलांच्या हात आणि पायांना गंभीर दुखापत झाली. धुरामुळे महिलांचा गुदमरून मृत्यू झाला. भीषण आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी पोहोचलं. मोठ्या प्रयत्नांनंतर इमारतीमधील आग आटोक्यात आणली. सकाळी ६.३१ वाजता आग विझविण्यात आली, अशी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. एका महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
- मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सहा वाजता वडगडी येथील राम मंदिराजवळील मस्जिद बंदर येथील इस्साजी स्ट्रीट, ४१/४३, पान अली मॅन्शन येथे असलेल्या ११ मजली उंच इमारतीत आग लागली. ही आग सुरुवातीला इमारतीच्या तळमजल्यावरील जनरल मीटर बॉक्स आणि इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये लागली.
आगीत दोन महिलांचा मृत्यू- आगीत ३० वर्षासह ४२ वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला. या महिलांना जेजे रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं. आगीत भाजल्यामुळे आणि धुरामुळे गुदमरून या महिलांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आगीच्या दुर्घटनेत २२ वर्षीय महिलेलादेखील गंभीर जखमी झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यातं. महिलेची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं. जेजे रुग्णालयाच्या माहितीनुसार, एकूण तीन जणांना रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्यापैकी साजिया आलम शेख (30) आणि सबिला खातून शेख (42) यांचा मृत्यू झाला. शाहीन शेख (२२) यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आगीचे कारण काय? अग्निशमन दलाच्या अधिकारी यांनी दिलेल्या इमारतीच्या तळमजला येथील मीटर बॉक्सला आग लागली होती. जागा अरुंद असल्यामुळे या आगीचा धूर वरच्या मजल्यापर्यंत पोहोचला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तीन-साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली. परंतु धुराचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात होते. हा धूर वरच्या मजल्यापर्यंत पोहोचल्यानंतर धुरामुळे महिला गुदमरून गेल्या होत्या. त्यांना उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथेच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. इमारतीच्या मीटर बॉक्सचा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही आग कशी लागली याची इमारतीच्या सुरक्षारक्षकाकडं चौकशी करण्यात येत आहे.
हेही वाचा-