हैदराबाद Valentine Week 2024 : प्रेमात पडलेल्या व्यक्तीला सर्व जग गुलाबी दिसतं, असं म्हणतात. प्रेमी युगुलांसाठी फेब्रुवारी महिना वेगळ्या अर्थाने गुलाबी रंग लेऊन आलेला महिना आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरु नये. 'लव्ह बर्ड्स' या महिन्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. याच महिन्यात 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन्स डे' जगभरात साजरा केला जातो. 'व्हॅलेंटाईन्स डे' लवकरच, 7 फेब्रुवारी (रोज डे) ने सुरू होणार आहे, जो 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन्स डे'नं समाप्त होईल. 'व्हॅलेंटाईन्स डे'ला लोक त्यांच्या जोडीदारांना भेटवस्तू देतात आणि त्यांच्यासोबत हँग आउट करण्याची योजना बनवून त्यांना सरप्राईज देतात. हे सर्वांनाच माहित आहे, पण तुम्हाला हे देखील माहित आहे का की 'व्हॅलेंटाईन्स डे' फक्त 14 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो? शेवटी, सेंट व्हॅलेंटाईन कोण होता? 'व्हॅलेंटाईन्स डे'चा इतिहास काय आहे आणि तो साजरा करण्यामागील खरी सुंदर कथा काय आहे ते जाणून घेऊ या.
'व्हॅलेंटाईन्स डे' साजरा करण्याची सुरुवात कशी झाली? :'व्हॅलेंटाईन्स डे' दरवर्षी 14 फेब्रुवारीला जगभरात साजरा केला जातो. ज्याची सुरुवात रोमन राजा क्लॉडियसच्या काळात झाली. असे म्हणतात की त्या काळी रोममध्ये सेंट व्हॅलेंटाइन नावाचा एक धर्मगुरू होता. 'व्हॅलेंटाईन्स डे'ची ही कहाणी त्यांच्या प्रेमाला आणि त्यागाला समर्पित आहे. ज्यांच्या नावाने नंतर 'व्हॅलेंटाईन्स डे' साजरा केला जाऊ लागला.