पाटणा : 'सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है', या ओळी स्वातंत्र्य चळवळी दरम्यान क्रांतिकारकांच्या ओठांवर होत्या. हे गीत गुणगुणताना स्वातंत्र्यलढ्याचे नायक रामप्रसाद बिस्मिल यांना फाशी देण्यात आली. अनेकांना आजही वाटतं की हे देशभक्तीपर गीत रामप्रसाद बिस्मिल यांनीच रचलंय. मात्र, या गाण्याचे खरे गीतकार हे राजधानी पाटणा (पूर्वीचे अजीमाबाद) येथील होते. या गीतकारानं जवळजवळ 40 वर्षे हे रहस्य आपल्या मनात दडवून ठेवलं होतं.
'सरफरोशी की तमन्ना'चे गीतकार कोण होते : 'सरफरोशी की तमन्ना'चे गीतकार सय्यद शाह मोहम्मद हसन बिस्मिल अजीमाबादी होते. पाटणा (पूर्वीचे अजीमाबाद) येथील क्रांतिकारकानं ही गझल रचली होती. बिस्मिल अझीमाबादी यांनी ही गझल 1921 मध्ये कोलकाता येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात पहिल्यांदा सादर केली. ज्या मासिकात ती प्रकाशित झाली त्या मासिकावर छापा टाकण्यात आला. गीतकाराच्या अटकेसाठी वॉरंट जारी करण्यात आलं. त्यामुळं बिस्मिल अझीमाबादी यांना भूमिगत व्हावं लागलं. या गाण्यातल्या भावनांमुळं बिस्मिल अझीमाबादींचा शोध अधिक तीव्र झाला.
- बिस्मिल अजीमाबादी यांचं शिक्षण आणि जीवन : बिस्मिल अजीमाबादी यांचा जन्म 1901 मध्ये एका जमीनदार कुटुंबात झाला. ते 2 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. वयाच्या 12 व्या वर्षापर्यंत त्यांनी घरीच अरबी-फारसीचं शिक्षण घेतलं. पुढं ते उच्च शिक्षणासाठी कोलकाता येथे गेले. काही वर्षे तिथंच राहिले. त्यानंतर वडिलांनी त्यांना पाटण्याला परत बोलावलं.
- गीतकाराचा खुलासा : बिस्मिल अझीमाबादी यांनी ही गझल 1920 मध्ये लिहिली होती. परंतु ब्रिटीश आणि पोलिसांच्या दबावामुळं त्यांच्या कुटुंबानं आणि स्वतः बिस्मिल अझीमाबादी यांनी ही गझल फार काळ सार्वजनिक केली नाही. 1960 नंतर, बिस्मिल अझीमाबादी यांनी स्वतः ही गझल सार्वजनिक केली. त्यानंतर सांगितलं की त्यांनी "सरफरोशी की तमन्ना" ही गझल रचली होती.
"क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांना फाशी दिली जात असताना त्यांनी या ओळी गुणगुणल्या होत्या. त्यानंतर या ओळी सर्वांसमोर आल्या. अनेकांना वाटतं की रामप्रसाद बिस्मिल यांनीच ही गझल लिहिली. मात्र, 1920 मध्ये बिस्मिल अझीमाबादी यांनी ही गझल लिहिली होती." - डॉ सय्यद मसूद, बिस्मिल अजीमाबादी यांचे नातू
- बिस्मिल अझीमाबादी यांचे 1978 मध्ये निधन झाले : बिस्मिल अझीमाबादी यांच्यासोबत वेळ घालवणारे त्यांचे नातू डॉ. सय्यद मसूद हसन म्हणाले,"त्यांचे कुटुंब खूप श्रेष्ठ होते. त्यांचे आजोबा गरजूंना मोफत उपचार देत असत. डॉ. मसूद यांनी असंही सांगितलं की, बिस्मिल अझीमाबादी यांचे 1978 मध्ये निधन झाले."
हेही वाचा -