How To Stop Overthinking: जीवन जगताना आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. प्रत्येक वेळी आपल्या वाटेला सुख येतील, असे होत नाही. आपल्या या परिस्थितीतून मार्ग काढण्याऐवजी आपण स्वतःलाच गुन्हेगार ठरवतो. आपल्याच वाटेला सर्वाधिक दुःख आले आहे, अशी आपोआपच मनात धारणा निर्माण होते. त्यामुळे आपण आनंदी जीवन जगण्यास असमर्थ ठरतो. यामुळे डोक्यात नेहमी विचारांचा कल्लोळ उठतो. एक ना अनेक विचारांच्या चक्रव्युवहामध्ये आपण अडकत जातो. सतत अतिविचार करणे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही. सतत विचार करत राहिल्यामुळे आपल्या कार्यक्षमतेवर प्रभाव पडतो. यामुळे भावनिकदृष्ट्या कमकुवत होतो. त्याचबरोबर नैराश्याचे शिकार होतो. तुम्ही देखील सतत कोणत्या ना कोणत्या विचारात राहता काय? काही टीप्स फॉलो केल्यास तुम्ही या समस्येपासून स्वत:ची सुटका करू शकता.
- ओव्हरथिंकिंगचे दुष्परिणाम
- सतत काळजी करणे
- निर्णय घेण्यात अडचण
- निद्रानाश आणि झोपमध्ये व्यत्यय
- सतत चिंता आणि तणाव राहणे
- मूड स्विंग
- जळजळ होणे
- हृदयाच्या आरोग्यावर परिणाम
- उपाय
- कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी( सीबीटी): अतिवाचार रोखण्याची ही एक मान्यताप्राप्त पद्धत आहे. ही चुकीच्या किंवा नकारात्मक विचारांच्या पद्दती बदलण्यात मदत करते.
- मेडिटेशन: मन शांत आणि स्थिर ठेवण्यासाठी नियमित मेडिटेशन करा. यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत होवू शकता. तसंच अतिरिक्त विचार थांबवण्यासाठी मेडिटेशन फायदेशीर आहे. तसंच तणाव कमी करण्यासाठी देखील मेडिटेशन फायदेशीर आहे. यामुळे तुमचं मन शांत राहते आणि नैराशा सारख्या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.
- नियमित 30 मिनिटं चाला किंवा धावा: चालणे ही एक साधी क्रिया. त्यामुळे न चुकता नियमित चाललं पाहिजे. चालण्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं. तसंच तुम्ही भावनिक दृष्ट्या सुदृढ राहता. चालण्यामुळे मेंदूचा रक्त प्रवाह सुरळीत होतो. ज्यामुळे तुम्हाला अधित ऑक्सिजन मिळतो. परिणामी तुम्हाला मानसिकदृष्ट्या तीक्ष्ण, एकाग्र राहण्यास मदत होते.
- गाणी ऐका: ओव्हरथिंकिंग पासून दूर राहण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे तुम्ही गाणी ऐकत राहा. गाणी ऐकल्यामुळे तुमचं प्रसन्न राहतं.
- मित्रांशी बोला: मित्राच्या सानिध्यात राहिल्यास तुम्ही विचार करण्यापासून दूर राहाल. यामुळे नियमित मित्रांशी बोला.
- स्वत:ला व्यस्त ठेवा: स्वत:ला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवा. कारण रिकामे बसले असाल तर तुम्ही अनेक विचार करू लागता. अशावेळी स्वत: ला एखाद्या कामात व्यस्त ठेवल्यास तुम्ही आनंदी राहू शकता. तुम्हाला ज्या गोष्टींमधून अधिक आनंद मिळतो ते करण्यात तुम्ही स्वत:ला व्यस्त ठेवा.
- नकारात्मक बोलणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहा. कारण अशी माणसं तुम्हाला मुद्दामहून त्रास देतात.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC4689615/