ETV Bharat / health-and-lifestyle

अभिनेत्री आलिया भटच्या आहारातज्ज्ञांनी दिल्या मधुमेह नियंत्रित करण्याच्या टीप्स; मधुमेह रुग्णांनी आजच फॉलो करा 'या' टिप्स - DIABETES DIET PLAN

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढणे धोकादायक असल्याचं म्हटलं जातं, त्यामुळे मधुमेह नियंत्रित करण्याचा हा सोपा उपाय जाणून घ्या पोषणतज्ञ डॉ. सिद्धांत भार्गव यांच्याकडून.

DR SIDDHANT BHARGAVA  DIABETES MANAGEMENT TIPS  DIABETES DIET PLAN  ALIA BHATTS DIET EXPERT TIPS c
आलिया भटच्या आहारातज्ज्ञांनी दिल्या मधुमेह नियंत्रित करण्याच्या टीप्स (FACEBOOK)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Jan 27, 2025, 7:44 PM IST

Updated : Jan 27, 2025, 7:52 PM IST

Dr Siddhant Bhargava Tips For Diabetes Patients: मधुमेह सायलेंट किलर आजार आहे. हा आजार शरीराचे आतून हळूहळू नुकसान करतो. मधुमेह असलेल्या व्यक्तीला खाणपाणाबद्दल अधिक पथ्य पाडावी लागतात. मधुमेह रुग्णाच्या रक्तातील सारखेचे प्रमाण वाढल्यास त्यांचं हृदय, यकृत, मूत्रपिंड आणि इतर अवयवांवर विपरीत परिणाम होतो. याकरिता रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढणे आणि कमी होणे टाळणे फार महत्वाचे आहे. आहार आणि संतुलित जीवनशैलीने साखरेवर नियंत्रण ठेवता येते. यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा दरम्यान, अभिनेत्री आलिया भट्टचे आहारतज्ञ डॉ. सिद्धांत भार्गव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी काही सोप्या टिप्स देण्यात आल्या आहेत. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये किंवा कमी होवू नये. याकरिता या पद्धतीने तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेवर सहज नियंत्रण ठेवू शकता.

पोषणतज्ञांच्या मते, तुमच्या शरीरात साखर जितकी जास्त असेल तितका तुमच्या अवयवांवर वाईट परिणाम होईल. मधुमेहींनी साखरेचे हे चढउतार टाळाण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत खालील 4 बदल करण्याचे सांगितले आहे.

  • एकत्र खा: आपल्या आहारात जास्तीत जास्त बाजरीचा समावेश करा गहू आणि तांदूळ शक्यतो टाळा. त्याची जागा ज्वारी, बाजरी, नाचणीच्या पीठाचा आहारात समावेश करा. या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे. जे मधुमेहींना साखरेच्या वाढीपासून वाचवते.
  • गोड खायचे असेल तर हे खा: मधुमेहींना अनेकदा मिठाई खाण्याची इच्छा असते. गोड खाण्याची इच्छा झाली तर पोट भरल्यावरच गोड पदार्थ खा. तसंच गोड पदार्थामध्ये नैसर्गिक शर्करा असलेले पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. मिठाई खाण्यापूर्वी काही फायबरयुक्त पदार्थ खाण्याची शिफारस डॉ. सिद्धांत भार्गव करतात. कारण फायबर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यास प्रतिबंध करते.
  • फक्त कर्बोदके खाणे टाळा: तुमच्या आहारात फक्त कार्बोहायड्रेटच नाही तर इतर पदार्थांचाही समावेश करा. त्या पदार्थांमध्ये फक्त पोहे, उपमा, भाकरी, भात किंवा इडलीच नव्हे तर काही प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करू शकता. जसे की, दही, चीज, चिकन किंवा अंडी. यासोबतच तुम्ही तुमच्या आहारात नट सारख्या काही चरबीच्या स्त्रोतांचा देखील समावेश करा.
  • खाल्ल्यानंतर १५ मिनिटे चाला: मधुमेहींनी जेवणानंतर १५ मिनिटे चालावे. जेवणानंतर १५ मिनिटे चालणे सुनिश्चित करा. विशेषत: न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यासारख्या जड जेवणानंतर तुम्ही चालले पाहिजे. हे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल.

(अस्वीकरण: ही सामान्य माहिती फक्त वाचण्यासाठी आहे. ईटीव्ही इंडिया माहितीच्या वैज्ञानिक वैधतेवर कोणतेही समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा

  1. हलक्यात घेऊ नका, पाणी पिताना लक्षात ठेवा या ४ गोष्टी!
  2. गुइलेन बॅरे सिंड्रोमपासून वाचण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश; 'या' पदार्थापासून रहा दहा हात लांब
  3. डोक्यात सतत विचारांचा कल्लोळ? आजच फॉलो करा या टिप्स
  4. अशाप्रकारे करा शरीरातील 'व्हिटॅमिन बी 12' ची कमतरता पूर्ण

Last Updated : Jan 27, 2025, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.