शिर्डी : गेल्या अनेंक दिवसांपासून अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनिता आहुजा वेगवेगळे राहत असल्याची चर्चा सुरू होती. यावर सुनिता आहुजा यांनी 'ईटीव्ही भारत'ला Exclusive प्रतिक्रिया दिली. "आमची मुलगी मोठी झाली आहे. गोविंदा राजकारणात आल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते सगळे घरी येत होते. त्यामुळं गोविंदानं आपलं ऑफिस बाहेर उघडलं. गोविंदा आणि मला या जगात कोणीच वेगळं करू शकत नाही. गोविंदा आणि मला वेगळं करणारं कोणी असेल तर त्यानं समोर यावं," अशी प्रतिक्रिया सुनिता आहुजा यांनी शिर्डीत दिली.
कोणीच वेगळं करू शकत नाही : अभिनेता गोविंदा यांच्या पत्नी सुनिता आहुजा यांनी रविवारी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे जावून दर्शन घेतलं. त्यानंतर शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं. साईबाबांच्या दर्शनानंतर 'ईटीव्ही भारत'बरोबर त्यांनी संवाद साधला. "मला आणि गोविंदाला या जगात कोणीच वेगळं करू शकत नाही. आम्हाला कोणी वेगळं करणारं असेल तर त्यानं समोर यावं," असं स्पष्ट सांगत गेल्या अनेक दिवसांपासून वेगळं राहत असल्याच्या चर्चांना पुर्णविराम दिला.
घर कधीच तुटू देणार नाही : वेगवेगळे राहत असल्याच्या चर्चेवर बोलताना सुनिता म्हणाल्या की, "गोविंदा आणि माझी कायमच चेष्टा चालू असते. घरातील लोकच घर तोडण्याचं काम करताय. मात्र, त्या लोकांना मी कधीच जिंकुन देणार नाही आणि माझं घर कधीच तुटू देणार नाही."
गोविंदाच्या मुलाचा येतोय चित्रपट : "मी साईबाबांना खूप मानते. खूप विश्वास असल्यानं वर्षातून एकदा साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येते. माझा मुलगा यश यानं नुकतंच चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं असून, त्याचा नवीन चित्रपट येतोय. यशचे वडील गोविंदा यांनी चित्रपटात आपलं जसं नाव कमावलं, त्यापेक्षा चार पटीनं यशचं नाव चित्रपट दुनियेत व्हावं यासाठी साईबाबांना प्रार्थना केली," असं सुनिता आहुजा म्हणाल्या.
हेही वाचा - आला रे आला 'सिंबा' आला, साई मंदिराच्या सुरक्षा पथकात नव्या श्वानाची एन्ट्री