हैदराबाद : 76 वा प्रजासत्ताक दिन रविवारी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यानिमित्तानं हैदराबाद येथील जगप्रसिद्ध रामोजी फिल्म सिटी येथेही प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. रामोजी फिल्म सिटीच्या एमडी विजयेश्वरी यांनी राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना घेतली.
अधिकारी, कर्मचारी उपस्थित : या सोहळ्याला रामोजी फिल्म सिटीच्या संचालक कीर्ती सोहाना, ईटीव्हीचे सीईओ बापिनेडू(Bapineedu), उषा किरण मूव्हीज प्रायव्हेट लिमिटेड (यूकेएमएल) संचालक शिव रामकृष्ण, यूकेएमएलचे उपाध्यक्ष (पब्लिसिटी) एव्ही राव, यूकेएमएलचे उपाध्यक्ष (उद्यान विभाग) रवी चंद्रशेखर आणि रामोजी फिल्म सिटीतील इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी.उपस्थित होते.
तिरंग्यासोबत सेल्फी : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ध्वजारोहण केल्यानंतर रामोजी ग्रुपच्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी तिरंग्यासोबत सेल्फी घेतले आणि एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
रामोजी फिल्म सिटीबद्दल : जगप्रसिद्ध 'रामोजी फिल्म सिटी'मध्ये विविध महोत्सवांचं आयोजन करण्यात येतं. कार्निव्हल परेड, आंतरराष्ट्रीय मनोरंजनादरम्यान लाइव्ह डीजेचा आनंद पर्यटकांना येथे घेता येतो. देशभरातून करोडो पर्यटक खास रामोजी फिल्म सिटी पाहण्यासाठी हैदराबादमध्ये येत असतात. बाहुबली, पुष्पासारख्या सुपर हिट चित्रपटांचं शूटिंग देखील याच फिल्म सिटीमध्ये झालंय. सुट्टी, सण, उत्सव, महोत्सव अशा विविध काळात रामोजी फिल्म सिटी पर्यटकांनी गजबजून जाते. राहण्यापासून ते फिरण्यापर्यंतच्या सर्व सुविधा पर्यटकांना फिल्म सिटीमध्ये मिळतात.
हेही वाचा -